MG Cars Discount Offer: दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन गोष्ट किंवा वस्तू घरी आणावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. या दिवसांत अनेक ऑफर्सदेखील मिळतात. त्यामुळं स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांकडे असते. दिवाळीत सोनं-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तु आणि त्याबरोबरच वाहन खरेदी करण्याकडेही अनेकांची पसंती असते. तुम्हीदेखील स्वस्तात कार खरेदी करण्याची संधी शोधत असाल तर एक कंपनी त्यांच्या वाहनांवर आकर्षक डिस्काउंट देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोव्हेंबरमध्ये एमजी मोटर त्यांच्या कारवर डिस्काउंट ऑफर देत आहेत. एस्टोर, जेडएस ईव्ही, हेक्टर, ग्लोस्टर आणि कॉमेट ईव्हीसह काही वाहनांवर डिस्काउंट देण्यात येत आहेत. एमजी त्यांच्या फ्लॅगशिप एसयूव्ही ग्लॉस्टरच्या सर्व व्हॅरियंटवर 1.35 लाख रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स ऑफर करत आहे. यात 50000 रुपयांचे कंज्यूमर ऑफर, 50000 रुपयांची एक्सजेंच बोनस, 20000 रुपयांचे लॉयल्टी बोनस आणि 15,000 रुपयांचे कॉर्पोरेट डिस्काउंटदेखील सहभागी आहेत. 


MG Hector आणि Gloster वर ऑफर


तसंच, हेक्टर आणि हेक्टर प्लसच्या सर्व व्हेरियंट्वर अॅनिव्हर्सरी प्राइसवर ऑफर करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्राहकांना 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 20,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळू शकतो. त्याच्या एन्ट्री-लेव्हल स्टाइल मॅन्युअल व्हेरियंटवर 25,000 रुपयांचा कंज्यूमर डिस्काउंटदेखील देण्यात येत आहे. 


MG Astor वर ऑफर


 Astor वर 2.10 लाख रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळत आहेत. त्याचबरोबर सर्व व्हेरियंट्सवर 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सजेंच बोनस, 20000 रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस आणि 10000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. याशिवाय, व्हेरिएंटवर अवलंबून 25,000 रुपये ते 1.25 लाख रुपयांच्या कंज्यूमर ऑफर देखील देण्यात येत आहेत.


MG ZS EV आणि Comet EV पर डिस्काउंट


सध्या ZS EV विशेष अॅनिव्हर्सरी प्राइजवर उपलब्ध असेल. याशिवाय 50000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 20000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 15000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटही दिला जात आहे. याशिवाय, ZS EV च्या Excite या वाहनांवर 50,000 रुपयांची ग्राहक ऑफर देखील उपलब्ध आहे. त्याच वेळी, Comet EV वर 20,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 15,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.