मुंबई :  मायाक्रोमॅक्स कंपनीने नुकतीच एका नव्या मोबाईल फोनची घोषणा केली आहे. या फोनमध्ये गूगलच्या अ‍ॅन्ड्रॉईड 'ओरियो गो' या ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला जाणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'ओरियो  गो' ऑपरेटिंग सिस्टीम असणारा हा भारतातील पहिलाच मोबाईल फोन आहे. या फोनची किंमत आणि फिचर्स अजूनही जाहीर करण्यात आलेले नसले तरीही ग्राहकांमध्ये याबाबत उत्सुकता आहे. 


कधी येणार हा स्मार्टफोन बाजारात  ? 


मायक्रोमॅक्सने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅन्ड्रॉईड ओरियोसोबत येणारा हा स्मार्टफोन 'भारत गो' या नावाने लॉन्च केला जाईल. या महिना अखेरीस हा स्मार्टफोन बाजारात येणार आहे. मात्र अजूनही तारखेबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.  


फीचर्स  


मायक्रोमॅक्सने स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबाबत माहिती दिलेली नाही. मात्र 'अ‍ॅन्ड्रॉईड ओरिओ एका नव्या अ‍ॅपसह येणार आहे. या अ‍ॅपचं नाव 'फाईल्स गो' असेल. तर ऑपरेटिंग सिस्टीमसोबत 'Youtube Go' देखील नव्या फीचर्स सोबत बाजारात येणार आहे.