मायक्रोमॅक्सनं लॉन्च केला बजेट स्मार्टफोन Yu Yunique 2
भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सची सहाय्यक कंपनी यू टेलीव्हेंचर्सनं मंगळवारी नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
मुंबई : भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सची सहाय्यक कंपनी यू टेलीव्हेंचर्सनं मंगळवारी नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Yu Yunique 2 असं या स्मार्टफोनचंन नाव असून अॅन्ड्रॉईड नोगटवर हा फोन काम करतो. या स्मार्टफोनची किंमत ५,९९९ रुपये एवढी आहे. फ्लिपकार्टवर २७ जुलैपासून हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.
Yu Yunique 2 हा सध्या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनसाठी कंपनीनं फ्लिपकार्ट आणि ट्रू कॉलरबरोबर पार्टनरशीप केली आहे. ट्रू कॉलर इंटिग्रेशनमुळे यूजर्सना स्पॅम प्रोटेक्शनबरोबरच कॉलर्सची माहिती डिफॉल्ट मिळणार आहे.
Yu Yunique 2 ची फिचर्स
- ५ इंच एलसीडी डिस्प्ले गोरीला ग्लास-३
- १३ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- 1.3GHz क्वॉडकोर मीडियाटेक प्रोसेसर
- 2GB रॅम
- 16GB की इंटरनल मेमरी
- मायक्रो एसडी कार्ड 64GB पर्यंत वाढवता येणार
- 2,500mAh बॅटरी
- 4G LTE, वायफाय, ब्लू टूथ, जीपीएस, एजीपीएस, एफएम, मायक्रो यूएसबी पोर्ट