नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत चीनी स्मार्टफोन कंपन्यांचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. हेच पाहून भारतीय स्मार्टफोन निर्माता मायक्रोमॅक्स कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायक्रोमॅक्स कंपनीच्या मते, प्रिमिअम टेक्नोलॉजी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मायक्रोमॅक्स इनफॉर्मेटिक्सचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी एका कार्यक्रमात म्हटले की, "आम्ही तेच करत आहोत ज्याच्यासाठी आमची ओळख आहे. पैशांची पूर्ण वसुली आणि चांगलं उत्पादन सामांन्यांपर्यंत पोहचवणं".


राहुल शर्मा यांनी पुढे म्हटलं की, आमची स्पर्धा आयफोन किंवा सॅमसंग गॅलक्सी एस८ प्लस सोबत नाहीये. तर आम्ही याच्याशिवाय मोठ्या संख्येने अधिक नागरिकांपर्यंत तसेच बाजारातील ९० टक्के भागापर्यंत पोहचवण्यास इच्छूक आहोत.


मायक्रोमॅक्स कंपनीचं लक्ष १०,००० रुपये ते २०,००० रुपयांच्या दरम्यान असलेल्या स्मार्टफोन्समध्ये आपली विक्री वाढवणं. त्यासोबतच १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोन्समध्ये आपलं वर्चस्व निर्माण करणं आहे. 


मायक्रोमॅक्सने मंगळवारी 'इनफिनिटी कॅनव्हास' स्मार्टफोन लाँच केला. या फोनची किंमत ९,९९९ रुपये आहे. या फोनचा डिस्प्ले अॅस्पेक्ट रेशो १६:९ आहे आणि या किंमतीत मिळणारा हा पहिला फोन आहे.