मुंबई: मायक्रोसॉफ्टने गुरुवारी Windows 11ची घोषणा केली. विंडोज 11 मध्ये नवा स्टार्ट मेन्यू आणि  सेंटर्ड टास्कबार नव्या युजर्ससाठी इंटरफेसचा भाग असेल. Windows 11 नवीन इंटरफेस आणि अ‍ॅनिमेशन इफेक्टसह यूजरसमोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या ऑपरेटिंग सिस्टिम किंव्या OSच्या windows 10 पीसीवर यासंदर्भातील अपडेट्स लवकरच मिळणार आहेत. Windows 11 नव्या थीम्स, ग्राफिक्स, नव्या स्वरुपात देण्यात आले आहेत. याशिवाय स्टार्ट मेनूमध्येही बदल करण्यात आले आहेत. Windows 11 मध्ये कोणत्या गोष्टी अजून खास असणार आहेत जाणून घेऊया. 


Windows 11ला पूर्णपणे नवा लूक देण्यात आला आहे. यामध्ये एडव्हान्स आणि आकर्षक थीम्सचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला ग्राफीक्स देखील चांगल्या क्वालिटिमध्ये मिळणार आहेत. 


पहिल्या पेक्षा जास्त वेगळ्या पद्धतीनं टास्कबार आता दिसणार आहे. यामध्ये अॅपचे आयकॉन्स आता एका कोपऱ्यात नाही तर मध्यभागी असणार आहेत. त्यामुळे आता हे फीचर युझर्ससाठी जास्त चांगलं असेल असा कंपनीचा दावा आहे. इतकच नाही तर स्मार्ट मेनू देखील यामध्ये असणार आहे. 


याच सोबत आपल्याला जस मोबाईलमध्ये एकावेळी मल्टीविंडो वापरता येतात तशाच पद्धतीनं आता विंडोज 11मध्ये एकपेक्षा जास्त विंडो वापरता येणार आहेत. त्यामुळे याचा फायदा तरुणांना, व्यवसायिकांना तसेज मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. 


तुमचा लॅपटॉप जर टच स्क्रीन असेल तर तुम्ही विंडोमध्ये कीबोर्डशिवाय देखील अगदी सहजपणे काम करू शकणार आहात. यामध्ये खास जेश्चर्स आणि फीचर्स देण्यात आले आहेत.