नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला उत्तर देताना म्हटलं आहे,' चाईल्ड पोर्नोग्राफी विरोधात लढा देण्यासाठी कडक पावलं उचलण्यात येतील. यासाठी सीबीएसईच्या शाळांमध्ये जॅमर लावण्यावर सरकार विचार करीत आहे, यामुळे विद्यार्थी पोर्नोग्राफी साईटपर्यंत पोहोचणार नाहीत', असं सरकारने कोर्टात सांगितल्याचं,  इंडियन एक्स्प्रेसने आपल्या बातमीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारचे जस्टीस दीपक मिश्रा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर सांगितलं, की शाळांमध्ये जॅमर लावलण्यावर आमचा विचार सुरू आहे. सरकारकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी म्हटलं आहे, आम्ही असे प्रयत्न करीत आहोत की यामुळे अशा अडचणींचं पूर्ण निर्मुलन होईल. मात्र त्यांनी हे देखील सांगितलं की, स्कूल बसेसमध्ये जॅमर लावणं तसे शक्य नाही.


मात्र या धर्तीवर प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये देखील मोबाईल जॅमर का लावण्यात येऊ नयेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे शिकवण्याच्या दरम्यान शिक्षकांकडून होणार मोबाईलचा गैरवापर बंद करता येऊ शकतो.