मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक
तुमचा मोबाईल सुरु ठेवण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : तुमचा मोबाईल सुरु ठेवण्यासाठी मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मार्च महिन्यामध्ये दूरसंचार मंत्रालयानं टेलिकॉम कंपन्यांना आदेश दिल्यानंतर आता एअरटेल आणि आयडियानं याबाबत ग्राहकांना मेसेज पाठवायला सुरुवात केल्याचं वृत्त इंडिया टूडेनं दिलं आहे. या मेसेजबरोबरच आयडिया आणि एअरटेलच्या स्टोरमध्येही याबाबतची माहिती देण्यात येत आहे.
मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडण्यासाठी ६ फेब्रुवारी २०१८ ही शेवटची तारीख असणार आहे. या तारखेपर्यंत आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक केला नाही तर मात्र तुमचा मोबाईल बंद पडू शकतो.
मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक कसा कराल?
१ मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्याबाबत मेसेज आल्यावर तुमच्या जवळच्या मोबाईल स्टोअरमध्ये जा
२ स्टोअरमध्ये गेल्यावर तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर स्टोअरमधल्या संबंधित व्यक्तीला द्या
३ यानंतर संबंधित व्यक्ती तुमच्या मोबाईल क्रमांकावर व्हेरिफिकेशन कोड पाठवेल.
४ हा व्हेरिफिकेशन कोड स्टोअरमधल्या संबंधित व्यक्तीला सांगा
५ यानंतर तुम्हाला फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे
६ फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन झाल्यावर २४ तासांच्या आत तुम्हाला आणखी एक मेसेज येईल. या मेसेजला Y टाईप करून रिप्लाय दिल्यावर तुमचं आधार कार्ड मोबाईलशी लिंक होईल.