मुंबई : तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत आहात? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मोटोरोलाने भारतीय बाजारात G सीरिजचे Moto G6 आणि Moto G6 Play हे दोन स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. दोन्ही फोन्सची खास बाब म्हणजेच यामध्ये टर्बो चार्जिंग फिचर देण्यात आलं आहे. तसेच Moto G6 मध्ये ड्युअलल कॅमेरा सेटअप आहे तर, Moto G6 Play फोनमध्ये 4000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  एक नजर टाकूयात या दोन्ही फोन्सच्या फिचर्स आणि किंमतवर...


Moto G6 फोनचे स्पेसिफिकेशन्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Moto G6 या फोनमध्ये 5.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा अॅस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे. यासोबतच फोनमध्ये 1.8GHz ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी 506 जीपीयू, 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असून आवश्यकता असल्यास मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.


यासोबतच फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. एक कॅमेरा 12MP चा आहे तर दुसरा 5 MP आहे. फ्रंट कॅमेरा 16 MP आहे. फोनमध्ये 3000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G LTE, वायफाय, USB टाईप सी, NFC, 3.5mm चा हेडफोन जॅक आणि ब्ल्यूटूथ 4.2 आहे. या फोनची किंमत 13,999 रुपये आहे. 


Moto G6 Play फोनचे स्पेसिफिकेशन्स


Moto G6 Play या फोनमध्ये 5.7 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा अॅस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे. यासोबतच फोनमध्ये अँड्रॉईड ओरियो 8.0,  ड्युअल सिम सपोर्ट, 1.4GHz चा ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी एड्रेनो 505 जीपीयू, 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असून आवश्यकता असल्यास मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.


फोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेऱ्यासोबत एलईडी फ्लॅश लाईट असून फोनची बॅटरी 4000mAh आहे. ही बॅटरी टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, वायफाय, USB टाईप सी, NFC, 3.5mm चा हेडफोन जॅक आणि ब्ल्यूटूथ 4.2 आहे. फोनच्या रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेसंर देण्यात आला आहे. या फोनची किंमत 11,999 रुपये आहे.