Moto ने लॉन्च केले 5GS आणि 5GS प्लस जबरदस्त स्मार्टफोन
मोटोरोलाने भारतात ५व्या जनरेशनच्या जी सीरीजमधील दोन नवे स्मार्टफोन G5S आणि G5S प्लस लॉन्च केले आहेत. याआधी मोटोने G5 आणि G5 प्लस हे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.
नवी दिल्ली : मोटोरोलाने भारतात ५व्या जनरेशनच्या जी सीरीजमधील दोन नवे स्मार्टफोन G5S आणि G5S प्लस लॉन्च केले आहेत. याआधी मोटोने G5 आणि G5 प्लस हे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.
मोटो G5 प्लस मोटोरोलाचा पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यात ड्यूअल कॅमे सेटअप दिला गेलाय. या फोन्सची विक्री अॅमेझॉनवर सुरू झाली आहे. मेटल बॉडीपासून तयार करण्यात आलेले हे दोन्ही स्मार्टफोन ७.१ नूगावर चालतात. भारतात G5S ची किंमत १३ हजार ९९९ रूपये तर G5S प्लस ची किंमत १५ हजार ९९९ रूपये इतकी आहे.
मोटो G5S चे फिचर्स
मोटो G5S मध्ये ५.२ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लासने कोटेड आहे. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ४३० ऑक्टाकोर प्रोसेसरवर काम करतो. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डसाटी स्लॉट देण्यात आलाय.
फोटोग्राफीची आवड असणा-यासाठी यात १६ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिला गेलाय. ज्यात f/2.0 aperture, PDAF आणि एलईडी फ्लॅश उपलब्ध आहे. तेच व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी f/2.0 आणि एलईडी फ्लॅशसोबत ५ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा देण्यात आलाय. पावर बॅकअपसाठी मोटो G5S मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यात टर्बोपावर सपोर्ट उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ५ तासांचं बॅकअप देऊ शकते.
मोटो G5S प्लस चे फिचर्स-
मोटो G5S प्लसमध्ये ५.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ ने कोटेड आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ ऑक्टाकोर प्रोसेसरवर काम करतो. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी दिली आहे. जी १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
मोटो G5S प्लसची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात देण्यात आलेला ड्युअल कॅमेरा सेटअप. यात १३ मेगापिक्सलचे दोन सेंसर दिले गेले आहेत. ज्यात बिल्ट-इन-डेप्थ एडिटर, सिलेक्टिव फोकस मोडसाठी सेटअप आणि DSLR सारखा डेप्थ ऑफ फिल्ड इफेक्ट दिला गेलाय. तसेच यात f/2.0 aperture, ड्युअल एलईडी फ्लॅश, auto HDR आणि 8X डिजिटल झूमसारखा फिचर्स देण्यात आलाय. यासोबतच सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.