MS Excel: कम्प्युटरवर तासांचं काम होणार मिनिटांत, फक्त हे शॉर्टकट माहित असले पाहिजे
MS Excel वर अनेक कामं सोपी होतात. पण फक्त तुम्हाला त्याचे शॉर्टकर्ट माहित हवेत.
मुंबई : डिजिटायझेशनच्या (Digitization) या युगात ऑफिस (Office) किंवा इतर कोणत्याही कामाच्या ठिकाणी नोकरी (job) मिळवण्यासाठी तुम्हाला कम्प्युटरच्या (computer) सर्व मूलभूत गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. एक्सेलवर (Excel work ) कसे काम करावे हे देखील माहित असणे गरजेचं आहे. डिजिटायझेशनमुळे डेटा देखील खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे हा डेटा समजून घेण्यासाठी त्याचा सारांश आणि विश्लेषण योग्य पद्धतीने करावे लागते आणि त्यासाठी एक्सेलचा (Excel) वापर केला जातो. हे लहान ते मोठ्या कंपन्यांपर्यंत जवळजवळ सर्व व्यवसाय कार्यांसाठी वापरले जाते. आजच्या युगात कोणत्याही कार्यालयात नोकरी (job) मिळवण्यासाठी एमएस एक्सेलचा वापर तुम्हाला माहित असणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच एमएस एक्सेलचे हे शॉर्टकट (shortcut)अतिशय उपयुक्त आहेत
Ctrl+A – कोणत्याही वर्कशीटमधील संपूर्ण डेटा निवडण्यासाठी
Ctrl+B - हायलाइट केलेल्या विभागातील सर्व सेल बोल्ड करण्यासाठी
Ctrl+C - हायलाइट केलेल्या विभागातील सर्व सेल कॉपी करण्यासाठी
Ctrl+D - कॉलम भरण्यासाठी
Ctrl+F - वर्तमान शीट शोधाण्यासाठी
Ctrl+G - एका विशिष्ट भागात जाण्यासाठी
Ctrl+H - काहीही शोधाण्यासाठी आणि बदल्यासाठी
F1 - हेल्प मेनू उघडण्यासाठी
F2 - सिलेक्ट केलेलं सेल एडिट करण्यासाठी
F3 - नाव पेस्ट करण्यासाठी
F4 - मागील कृतीची पुनरावृत्ती करण्यासाठी
F5 - नवीन पेज करण्यासाठी
या शॉर्टकटचा तुम्ही वापर केला तर नक्कीच तुमचं वेळ तर वाचेल आणि काम देखील फास्ट होईल.
MS Excel, Computer,student,office worker,job