मुकेश अंबानी यांनी केला सर्वात मोठा खुलासा, पाहा कुणी दिली होती JIOची आयडीया
देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ संदर्भात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा केला आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ संदर्भात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा केला आहे.
टेलिकॉम सेक्टरमध्ये खळबळ
भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये रिलायन्स जिओने पदार्पण करताच टेलिकॉम सेक्टरमध्ये एकच खळबळ उडाली. इतकचं नाही तर, रिलायन्स जिओने दोन वर्षांतच भारतीय बाजारपेठेत सर्वात मोठं मोबाईल ब्रॉडबँड वापरणारा देश बनवलं.
मुकेश अंबानी यांनी लंडनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात रिलायन्स जिओची आयडीया कशी आली यासंदर्भात खुलासा केला आहे.
या व्यक्तीने दिली जिओची आयडीया
रिलायन्स जिओ (Jio)ची आयडीया आपली मुलगी ईशा अंबानी दिली असल्याचं मुकेश अंबानी यांनी दिली. ईशाने २०११ मध्ये जिओची आयडिया दिली असल्याचंही यावेळी मुकेश अंबानी यांनी सांगितलं.
जिओने ३१ बिलियन डॉलरची केली गुंतवणुक
मुकेश अंबानी यांनी गुरुवारी रात्री लंडनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला 'ड्रायवर्स ऑफ चेंज' (Drivers of Change) अवॉर्ड मिळाल्यावर आपली प्रतिक्रिया दिली. या दरम्यान अंबानींनी सांगितले की, रिलायन्स जिओने भारतीय टेलकॉम मार्केटमध्ये ३१ बिलियन डॉलर (जवळपास दोन हजार कोटी रुपये) गुंतवणुक केली आहे.
सप्टेंबर २०१६ मध्ये सुरु झालेल्या रिलायन्स जिओने लॉन्चिंगनंतरच बाजारात खळबळ उडवली होती. यानंतर टेलिकॉम सेक्टरमध्ये डेटा आणि प्राईस वॉर सुरु झालं होतं.
ईशाने दिली आयडीया
मुकेश अंबानी यांची मुलगी २०११ मध्ये येल युनिवर्सिटीत शिक्षण घेत होती. यावेळी सुट्टी दरम्यान ईशा घरी आली होती. सुट्टी दरम्यान ईशाला प्रोजेक्ट्स बनवायचे होते. पण, घरी इंटरनेट खूपच खराब स्पीडने सुरु होतं. युथ जनरेशनला बेस्ट बनवण्यासाठी वाट पाहण्याची सवय नाहीये त्यामुळे तरुणांनाही ब्रॉडबँड इंटरनेट आणखीन नव्या रुपात देण्याची आवश्यकता असल्याचं जाणवलं.
इंटरनेट डेटा खूपच होतं महाग
मुकेश अंबानी यांनी सांगितले की, २०११ मध्ये भारतात खूपच वाईट कनेक्टिविटी होती. फास्ट स्पीड असलेला डेटा प्लान खरेदी करण्यासाठी युजर्सला खूपच पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे जिओने स्वस्त इंटरनेट डेटा देण्याचं ठरवलं.