`या` अॅप्सवर मोफत पाहता येणार Webseries आणि मुवी, जाणून घ्या
नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमचं सब्सक्रिप्शन सोडा, `या` अॅप्सवर पाहा फ्री वेबसीरिज
मुंबई : टीव्हीवर सिनेमा पाहणारा प्रेक्षकवर्ग आता मोबाईलवर कन्वर्ट झाला आहे. Netflix, Amazon Prime, Hotstar सारखे सब्सक्रिप्शन घेऊन आता अनेक प्रेक्षक सिनेमे पाहतातय. मात्र हे सब्सक्रिप्शन प्रत्येक प्रेक्षकाला परवडणारे नसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असे अॅप्स सांगणार आहोत, ज्यावर तुम्हाला मोफत मुवी आणि वेबसीरिज पाहता येणार आहेत. त्यामुळे हे अॅप्स कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
वुट
जर तुम्हाला टीव्ही शो मोफत पाहायचे असतील तर तुम्ही गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरून Voot अॅप डाउनलोड करा. या अॅपवर कलर्स आणि एमटीव्हीचे अनेक शो उपलब्ध आहेत. तुम्हालाही चित्रपट मोफत पहायचे असतील, तर तुम्हाला जाहिरातीही पाहाव्या लागतील.
जिओ सिनेमा
JioCinema अॅप Google अॅप आणि अॅपल अॅपवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. सर्व जिओ वापरकर्ते JioCinema अॅपद्वारे चित्रपट आणि टीव्ही मालिका विनामूल्य पाहू शकता. हे अॅप हिंदीसह अनेक भाषांचे चित्रपट पाहण्याची संधी देते.
एमएक्स प्लेअर
MX Player ऑफलाइन व्हिडिओ प्लेअर म्हणून लाँच केले गेले. आता ते 12 भाषांमध्ये सिनेमा पाहण्याची संधी देते. यामध्ये, तुम्ही MX Originals आणि फीचर शो पाहण्यास सक्षम असाल.
तुबी
जर तुम्हाला हॉलिवूड चित्रपट आणि शो आवडत असतील तर Tubi हे एक चांगले अॅप आहे. त्यावर हॉलीवूडचे चित्रपट पाहता येणार आहेत. तुम्ही इंग्रजी चित्रपट आणि टीव्ही शो एचडी गुणवत्तेत पाहू शकता.
प्लेक्स
Plex स्ट्रीमिंग सेवेसह, वापरकर्ते चित्रपट आणि टीव्ही शो विनामूल्य पाहू शकतील. या प्लॅटफॉर्मवर 200 हून अधिक लाईव्ह चॅनेल मोफत पाहण्याची सुविधा असेल. त्यात हिंदी सामग्रीसह शोचाही समावेश आहे.