नवी दिल्ली : नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म्सची मागणी दिवसागणिक वाढताना दिसत आहे. शिवाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे डिजीटल  प्लॅटफॉर्म्स अनेक ऑफर्स बाजारात आणत असतात. ग्राहक देखील कंपन्यांकडून मिळणाऱ्या सववतींना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असतात. दरम्यान नेटफ्लिक्सने देखील ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर सुरू केली आहे. गेम खेळा आणि ८३ वर्षे नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन देण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल ८३ वर्षे किंवा १ हजार महिने मोफत नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी तुम्हाला एक गेम खेळावा लागणार आहे. या गेमचं नाव आहे ‘द ओल्ड गार्ड’. या गेममध्ये टॉप स्कोअर केल्यानंतर तुम्ही कंपनीकडून जाहीर केलेली ऑफर मिळवू शकता. 


ऑल्ड गार्ड गेम हा ब्राऊसरवर आधारित एक गेम आहे. https://www.oldguardgame.com/ या वेबसाईटवर हा गेम खेळता येणार आहे. नेटफ्लिक्सनं न्यू नेटफ्लिक्स ओरिजनल स्ट्रीमिंग सर्व्हिससाठी इम्मॉर्टल नेटफ्लिक्स अकाऊंट लाँच केला असून विजेत्या ग्राहकाला ८३ वर्षांसाठी नेटफ्लिक्सचं सबस्क्रीप्शन देण्यात येतं.


महत्वाचं म्हणजे  १९ जुलैपर्यंत ही ऑफर सुरू राहणार असून सध्या फक्त  अमेरिकेतील ग्राहकांसाठी ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.