नवी दिल्ली : अनेकदा नकळत, चुकून एखादा महत्त्वाचा किंवा आवडता फोटो डिलीट होतो. मग तुम्ही त्रासता, वैतागता, तुम्हाला स्वतःचाच राग येतो. पण आता यापुढे तुमच्यावर ही वेळ येणार नाही. कारण असे काही अॅप्स आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही डिलीट झालेले फोटोज, व्हिडिओज पुन्हा मिळवू शकता. तर पहा कोणते आहेत हे अॅप्स...


DiskDigger Photo Recovery


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे अॅप गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करा. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही डिलीट झालेले फोटो पुन्हा मिळवू शकता. त्याचबरोबर या अॅपमध्ये डिलीट झालेले फोटो पुन्हा सेव्ह आणि अपलोड करण्याचाही पर्याय देण्यात आलेला आहे. या अॅपचे सर्व फिचर फ्री आहेत.
हे अॅप आतापर्यंत १ कोटीहुन अधिक युजर्सने डाऊनलोड केले आहे. तर १ लाख ८३ हजार युजर्सनी यावर रिव्हु दिले आहेत. प्ले स्टोरवर या अॅपला ४.२ रेटिंग मिळाली आहे.



Restore Image (Super Easy)


हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोरवरुन मोफत डाऊनलोड करु शकता. याचे सर्व फीचर्स देखील फ्री आहेत. अॅपच्या मदतीने तुम्ही डिलीट फोटोज लगेच रिकव्हर करू शकता. रिकव्हर कटेंन्ट तुम्ही एसडी कार्ड किंवा फोनच्या मेमरीमध्ये सेव्ह करु शकता. हे अॅप JPG आणि PNG या दोन फॉर्मेटला सपोर्ट करतं.
१ करोड युजर्सने डाऊनलोड केलेल्या या अॅपवर ५९ हजार युजर्सचे रिव्हुज मिळाले आहेत. गुगल प्ले स्टोरवर याची रेटींग ४.० आहे.


Dumpster: Undelete & Restore Pictures and Videos


हे एक जबरदस्त अॅप असून याच्या माध्यमातून तुम्ही फोटोज आणि व्हिडिओज दोन्ही रिकव्हर करु शकता. कमी वेळात रिकव्हरीचे काम होते. अॅपची साईज ११ एमबी असून यात अनेक प्रिमियम फिचर्स आहेत. याच्या मदतीने तुम्ही रिकव्हर कटेंन्ट दुसऱ्या युजर्सपासून सुरक्षित करु शकता. त्याचबरोबर क्लाऊड स्टोरेजचेही फिचर देण्यात आले आहे.
१ करोड युजर्सने डाऊनलोड केलेल्या या अॅपवर २ लाख लोकांनी रिव्हुज लिहिले आहेत. याचे रेटिंग ४.१ आहे.