Boult FX Charge:  भारतातमध्ये मोबाईल अॅक्सेसरीज (mobile accessories)  आणि इअरबड्स बनवणाऱ्या बोल्ट ऑडियोने (bolt audio) नवीन neckband earphones लॉंच केले आहेत. बोल्ट एफएक्स चार्ज (bolt fx charge) असे या neckband earphones चे नाव असून  या इयरफोन्समध्ये सुपरफास्ट चार्जिंगशिवाय इतरही अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच या कंपनीचा दावा आहे की, त्याची बॅटरी 32 तासांपर्यंत चालणारी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच Boult FX चार्जची किंमत 4,499 रुपये आहे. पण, ऑफरमध्ये ते केवळ 899 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा नेकबँड काळ्या आणि हिरव्या रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तुम्ही ते ई-कॉमर्स साइट Amazon किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता.


बोल्ट एफएक्सचे चार्ज वैशिष्ट्ये 


Boult FX चार्जच्या  डिव्हाइस iOS, Android व्यतिरिक्त मॅकबुक (macbook) आणि Windows लॅपटॉपशी कनेक्ट केले जाऊ शकते. त्याला पाणी प्रतिरोधक IPX5 रेटिंग आहे. या उपकरणात 14.2mm चा ऑडिओ ड्रायव्हर्स देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.2 सपोर्ट करण्यात आला आहे. हे डिव्हाइस फॅक्टरी रीसेट करण्यासाठी 10 सेकंद लागतात. तसेच Boult FX चार्जची बॅटरी लाइफ चांगली आहे. हे फक्त 5 मिनिटांच्या चार्जवर 7 तास वापरले जाऊ शकते. पूर्ण चार्ज झाल्यावर ते 32 तास टिकते. हे चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सीला समर्थन देते. Boult Audio हा मूळ ब्रँड असून मोबाईल अॅक्सेसरीज व्यतिरिक्त, हे इअरफोन आणि इतर गॅझेट्स बनवण्यासाठी ओळखले जाते.