नवी दिल्ली : तुम्हाला गाडी चालवता येत नसेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. कारण आता ड्रायव्हरलेस कार लवकरच बाजारात येणार आहे. चीनची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी बाईटन एक इलेक्ट्रिक सेडान कार आणणार आहे. ही ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक कार आहे, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर जवळजवळ 520 किलोमीटर धावेल. बाइटन के-बाइट नावाची ही इलेक्ट्रिक कार टेस्ला मॉडेल 3 ला टक्कर देईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या वर्षी होणार लॉन्च
माध्यमांच्या वृत्तानुसार, ही नवीन बायटन के-बाइट इलेक्ट्रिक कार पुढील वर्षी बाजारात येऊ शकते. 2018 मध्ये ही कार प्रथम ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली होती.


सिंगल चार्जमध्ये 520 किमी धावणार


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बायटन के-बाइट इलेक्ट्रिक कार दोन व्हर्जनमध्ये लाँच केली जाईल. कारचा बेस व्हेरिएंट 75kWh आणि टॉप व्हेरिएंट 95kWh बॅटरी पॅकसह येईल. 75 kwh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह येणारी वेरियंट एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 402 किमी पर्यंत धावू शकेल. तर 95kWh बॅटरी पॅक व्हेरियंटची कार सुमारे 520 किमी धावेल.


आकर्षक लूक


या इलेक्ट्रिक कारने आकर्षक डिझाईन आणि इंटीरियरमुळे लोकांना आकर्षित केले आहे. पकारच्या आत एक मोठी डिजिटल इन्फोटेनमेंट स्क्रीन देण्यात आला आहे. याशिवाय स्टेयरिंग व्हीलवर एक छोटी स्क्रीन देखील आहे. 


कारची किंमत 
बायटन के-बाईक इलेक्ट्रिक कारच्या बेस मॉडेलची किंमत सुमारे 45 हजार डॉलर्स म्हणजेच 34.42 लाख रुपये असेल.