मुंबई: तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर त्यावर गाणी ऐकण्यासाठी अथवा चित्रपट बघण्यासाठी इयरफोन गरज असते. खासकरून सार्वजनिक ठिकाणी असल्यास इयरफोन्सच्या माध्यमातून फोनवर बोलण्यास, गाणी ऐकण्यास मदत होते. बाजारात दमदार फीचर्ससह येणारे अनेक शानदार वायर्ड इयरफोन्स, इयरबड्स आणि नेकबँड इयरफोन्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लो-बजेट सेगमेंटमध्ये इअरबड्स शोधले तर तुम्हाला अनेक उत्पादने मिळतील. पण युनिक डिझाइन असलेल्या इअरबड्सची संख्या खूपच कमी आहे. असाच एका कंपनीने इअरबड्स लॉन्च केले असून दिसायला क्रिकेट बॉलसारखे आहेत पण त्यावर आपण गाणी ऐकू शकणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट बॉलसारखे दिसणारे इअरबड्स (Earbuds) Ubon या कंपनीने  लाँच केले आहे. बाजारात Sennheiser CX 120BT, Sony MDR-XB55AP, JBL C200SI by Harman Earphones, boAt Rockerz 330 Pro आणि boAt Airdopes 171 सारखे स्वस्त इयरफोन्स उपलब्ध आहेत. मात्र त्याहून स्वस्त UBON चे BT - 210 क्रिकेट बॉल वायरलेस इअरबड्स असू शकतात.


जाणून घेऊया त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत...


तुम्ही हे इयरबड्स 3,299 रुपयांना खरेदी करू शकता.  Flipkart, Amazon आणि UBON च्या अधिकृत वेबसाइटवरून UBON BT - 210 वायरलेस इयरबड खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. हे उत्पादन ऑफलाइन बाजारातही उपलब्ध आहे. तसेच या इअरबड्सला 6 महिन्यांची वॉरंटी देखील आहे. 



वैशिष्ट्ये काय आहेत?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, UBON चे नवीन इयरबड्स क्रिकेटप्रेमींना लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये आवाजाची गुणवत्ता आणि 20 तासांचा प्लेटाइम मिळेल. या इयरबड्सना 300mAh ची बॅटरी असणार आहे. यात ड्युअल माइक सपोर्ट, कॉल रिसिव्ह करण्याची देखील सुविधा आहे. तसेच इअरबड्समध्ये सिरी आणि गुगल असिस्टंट देखील असणार आहे.