Facebook मेसेंजरमधील नवं फिचर, दूर अलेल्या मित्रांसह बघा व्हिडिओ
युजर्सची गरज लक्षात घेत सोशल मीडिया प्लॅटफॉममध्ये अनेक बदल होत असतात.
मुंबई : आताच्या युगात सोशल मीडियाचा वापर सर्वच जण मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यामुळे युजर्सची गरज लक्षात घेत सोशल मीडिया प्लॅटफॉममध्ये अनेक बदल होत असतात. आता Facebook ने आपल्या युजर्ससाठी नवं फिचर जारी केलं आहे. कंपनीने नुकताच आपल्या युजर्ससाठी वॉच टुगेदर (Watch Together) हे नवीन फिचर बाजारात आणलं आहे. या फिचरच्या मदतीने यूजर्स दूर असलेल्या मित्रांसह व्हिडिओ पाहू शकतात.
महत्त्वाचं म्हणजे 'वॉच टुगेदर' हा Facebook मधील नवा फिचर सर्वच व्हिडिओला सपोर्ट करतो. फेसबुकने अलीकडेच मेसेंजरसाठी स्क्रीन शेअरिंग फीचर देखील जारी केले. या फिचरचा उपयोग तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकता.
'वॉच टुगेदर' या फिचरचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला मेसेंजर व्हिडिओ सुरू करावा लागेल. त्यानंतर मेसेंजर रूम क्रिएट करा. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तुम्हाला मेन्यूमध्ये जावं लागेल आणि त्याठिकाणी 'वॉच टुगेदर' हा पर्याय निवडावा लागेल.
याशिवाय तुम्ही तुमच्या मित्रांसह किंवा कुटुंबासह नवीन कटेंट पाहू इच्छीत असाल तर वेग-वेगळ्या प्रकारांमधील कंटेंट निवडू शकता. त्याचप्रमाणे सर्च ऑप्शनमध्ये जावून तुम्ही तुमच्या आवडतीचं कंटेंट सर्च करू शकता. मेसेंजर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एका वेळेस ८ जण एकत्र व्हिडिओ पाहू शकतात. तर मेसेंजर रूमच्या माध्यमातून एका वेळेस ५० जण व्हिडिओ कॉल कनेक्ट करू शकतात.