फेसबुकप्रमाणे व्हॉट्सअॅपनेही लॉन्च केले `हे` नवे फिचर....
व्हॉट्सअॅपने आयफोन युजर्ससाठी नवीन फिचर सुरू केले आहे.
सेन्ट फ्रांसिस्को : व्हॉट्सअॅपने आयफोन युजर्ससाठी नवीन फिचर सुरू केले आहे. ज्यामध्ये व्हॉट्सअॅपवर पाठवलेला व्हिडिओ बघण्यासाठी युट्युब ओपन करावे लागणार नाही. आता युट्युब व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप बाहेर जावे लागणार नाही. तुमच्या व्हिडिओ चॅटवर तो चालेल.
व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल
व्हॉट्सअॅपचा बीटा प्रोग्रॅम चालवणारी एक वेबसाईट डब्ल्यूएबीटाइंफोच्या नुसार, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युजर्सना अॅपल प्ले स्टोअरमध्ये जावून व्हॉट्सअप अपडेट करावे लागेल. त्यात अजून काही सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत. युजर्संना व्हॉट्सअॅपवर युट्युब व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओवर एक प्ले चे ऑप्शन येईल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर फेसबुकप्रमाणे युट्युबवर गेल्याशिवाय व्हिडिओ बघू शकता.
यापूर्वी फेसबुकने सुरू केले हे फिचर
यापूर्वी अशाप्रकारची सुविधा फेसबुकतर्फे सुरू करण्यात आली होती. या फिचरनंतर फेसबुकवरच युट्युब व्हिडिओ पाहायला मिळतो. फेसबुकच्या या फिचरला युजर्सचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सध्या ही सुविधा अॅनरॉईड युजर्ससाठी सुरू करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच ती सुरू करण्यात येईल अशी आशा आहे.