फोर्ड इकोस्पोर्ट कारचं नवं व्हर्जन होणार आज लॉन्च
फोर्ड इंडियाची प्रॉप्युलर कॉम्पॅक्ट एसयूव्ही इकोस्पोर्टचं फेसलिफ्ट व्हर्जन आज लॉन्च होणार आहे. लॉन्चच्या आधीच या कारचे फिचर्स आणि किंमत चर्चेत आली आहे.
नवी दिल्ली : फोर्ड इंडियाची प्रॉप्युलर कॉम्पॅक्ट एसयूव्ही इकोस्पोर्टचं फेसलिफ्ट व्हर्जन आज लॉन्च होणार आहे. लॉन्चच्या आधीच या कारचे फिचर्स आणि किंमत चर्चेत आली आहे.
कंपनीने कारच्या १२३ यूनिटची अॅडव्हांस बुकिंग सुरू केली होती. काही तासांमध्येच सर्वच गाड्या बुक झाल्या होत्या.
ही असू शकते किंमत -
फोर्ड इकोस्पोर्टच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या कारचा लूक आणखी स्टायलिश करण्यात आला आहे. तर फिचर्सही नवे देण्यात आले आहेत. कंपनीने सध्या या कारच्या किंमतीचा खुलासा केला नाही. पण असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, कारची किंमत ६ ते १० रूपये दरम्यान असू शकते.
५ व्हेरिएंटमध्ये येणार फेसलिफ्ट मॉडल
फोर्ड इकोस्पोर्टच्या फेसलिफ्ट व्हर्जनच्या पेट्रोल, डिझल इंजिनसहीत एकूण पाच व्हेरिएंट लॉन्च होणार आहे. बेस व्हेरिएंटला Ambiente असं नाव देण्यात आलं आहे. तर ट्रेंड आणि ट्रेंड प्लस मिडलेव्हल व्हेरिएंट आहेत.
हे आहेत फिचर्स -
बेस व्हेरिएंट - ड्युअल एअरबॅग्स, एबीएस, सेफ क्लच स्टार्ट, पावर डोर लॉक, इंजिन इममोबिलायझर, हेडलॅंप, चाईल्ड लॉक, डोर वार्निंग, इमरजन्सी ब्रेक लाईट फ्लॅशिंग, ब्लूटूथ हॅंड्सफ्रिसोबत ४ स्पीकर ऑडिओ सिस्टम, हॅलोजन क्वाडबीम फॉगलॅम्प दिला गेलाय.
ट्रेंड व्हेरिएंट - बेस व्हेरिएंटच्या फिचर्ससह मोबाईल नॅव्हिगेशन, अॅपल कारप्ले आणि अॅन्ड्रॉईड ऑटो कनेक्टिव्हीटी, स्टीअरींगमध्ये कंट्रोल की, ड्यूअल यूएसबी पोर्ट दिला गेलाय.
ट्रेंड प्लस व्हेरिएंट - लोड कम्पार्टमेंट लाईट, पॅडल लॅम्प, इलेक्ट्रॉनिकली फोल्ड होणारा रिअर व्ह्यू मिरर, ड्राईव्हर सीट हाईट अॅडजस्टमेंट, रिव्हर्स पार्किंग सेंसर, ड्रायव्हर साईट विंडो एका टचमध्ये अप-डाऊनसारखे अतिरीक्त फिचर्स.