नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपन्यांमध्ये अटीतटीची स्पर्धा आहे, यातच कंपन्या नाव नवीन फोन लॉन्च करत आहेत. स्मार्टफोन कंपनी एम-टेक (M-tech) इंफोर्मेटिक्‍स ने एका नवा फोन सादर करून बाजारात धमाका झाला आहे. कंपनीने ८९९ किंमतीचा ड्युअल कॅमेरा फोन लॉन्च केला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

M-tech इंफोर्मेटिक्‍स ने सादर केलेला हा फोन स्वस्त असून त्याचे फीचर्स देखील आकर्षक आहेत. ड्युअल सिम असलेला हा फोन १.८ इंच QQVGA डिस्प्ल्ये आणि डिजिटल कॅमेरा आहे. फोनमध्ये १००० mAh ची बॅटरी आहे. त्याचबरोबर वायरलेस एफएम रेडियो, ब्लूटूथ आणि ऑडिओ व्हिडीओ रिकार्डिंगची सुविधाही देण्यात आली आहे. 


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, G24 हा फोन इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू आणि बंगाली या भाषांमध्ये सपोर्ट करतो. हा फोन ई-कॉमर्स वेबसाईट्स वर देखील विक्रीसाठी उपलब्ध असेल. एम-टेक इंफोर्मेटिक्‍स लिमिटेड चे डिरेक्टर गौतम कुमार जैन यांनी सांगितले की, "G24 हा सेल्फी फोनला पॉवरफुल बॅटरी बॅकअप आहे. 


याचे इंटर्नल स्टोरेज १६ GB पर्यंत वाढवता येऊ शकते. यात एमपी3/एमपी4/डब्‍ल्‍यूएवी प्‍लेयर, ऑटो कॉल रिकॉर्ड आणि टॉर्च यांसारख्या सुविधा आहेत. G24 हा फोन काळ्या, लाल, निळ्या, ग्रे आणि ब्राऊन अशा पाच आकर्षक रंगात उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच कंपनीने ४,९९९ किंमतीचा 4G स्मार्टफोन लॉन्च केला होता.