नवी दिल्ली :  गुगलने नुकतेच गूगल पिक्सल २ आणि पिक्सल २ XL हे स्मार्टफोन लॉंच केले आहेत. गुगल पिक्सल २ ची किंमत अंदाजे ४२,२०० पर्यंत असणार आहे. याव्यतिरिक्त, पिक्सेल २ एक्सएल (६४ जीबी) ची किंमत ५५,२०० असणार आहे. त्यामूळे भारतात हे स्मार्टफोन कधी उपलब्ध होणार याविषयी सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यावरील पडदा आता उघडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील पिक्सेल २ ची प्रीबुकिंग २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पिक्सेल २ ची विक्री १ नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर पिक्सेल 2 एक्सएल १५ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. साधारण १००० स्टोअर्स तसेच फ्लिपकार्टवरही हा स्मार्टफोन  उपलब्ध असणार आहे. आयफोन ८, आयफोन एक्स आणि सॅमसंग नोट ८ सारख्या या स्मार्टफोन कंपन्यांनना हा टक्कर देईल. कंपनीने सुरु केलेल्या नवीन उत्पादनांपैकी,गुगल होमचे उत्पादन असलेल्या होम मिनी आणि होम मॅक्सच्या नव्या एडिशनमध्ये लॅपटॉप क्रोमबुकच्या ४ इन १ पिक्सेलबॅक, गुगल लेन्स आणि गुगल क्लिपचा समावेश आहे.


 
गुगल पिक्सल २ 


डिस्प्ले
गुगल पिक्सेल २ हा एचटीसीने डिझाईन केलेला ५ इंच पूर्ण एचडी (१०८०x१९२० पिक्सेल) डिस्प्ले 
प्रोसेसर ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन८३५ 
 पिक्सल्स २४ जीबी एलपीडीडीआर ४ एक्स. 
६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेजसह 2 रूपे लाँच केले आहेत.


कसा आहे कॅमेरा 


पिक्सेल २ चे मागील कॅमेरा १२.२ मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा ८ मेगा पिक्सल आहे. त्याचा कॅमेरा ४ फ्रेम्स प्रति सेकंद वेगाने ४,००० रिझॉल्यूशनसह व्हिडिओ रेकॉर्ड 
 
 बॅटरी:  बॅटरी २७०० एमएएच, १५ मिनिटापर्यंत चार्जिंगवर ७ तास चार्ज


गुगल पिक्सेल २XL


डिस्प्ले : ६ इंच QHD + (२८८०x१४४० पिक्सेल), कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ कोटिंग 
बॅटरी:  डिव्हाइस बॅटरी ३५२० एमएएच, १५ मिनिटापर्यंत चार्जिंगवर ७ तास चार्ज