मुंबई : जर तुम्ही नवीन सिम घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण सरकारने सिमकार्डबाबत नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार आता सर्वांनाच नवीन सिम खरेदी करता येणार नाही आहेत. तसेच सिम खरेदीसाठी दुकानातही जायची आवश्यकता भासणार नाहीए. त्यामुळे नेमके नवीन नियम काय आहेत जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियमात बदल 


  • नवीन नियमानुसार कंपनी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांना नवीन सिम विकू शकत नाही.

  • 8 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ग्राहक त्यांच्या नवीन सिमसाठी आधार किंवा डिजीलॉकरमध्ये साठवलेल्या कोणत्याही दस्तऐवजासह स्वतःची पडताळणी करू शकतात.

  • DoT चे हे पाऊल 15 सप्टेंबर 2021 रोजी कॅबिनेटने मंजूर केलेल्या दूरसंचार सुधारणांचा एक भाग आहे.

  • आता वापरकर्त्यांना नवीन मोबाइल कनेक्शनसाठी आधार आधारित ई-केवायसी सेवेद्वारे प्रमाणीकरणासाठी फक्त 1 रुपये द्यावे लागतील.


या ग्राहकांना सिम मिळणार नाही 


  • दूरसंचार विभागाच्या नवीन नियमांनुसार, आता कंपनी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या वापरकर्त्यांना सिम कार्ड मिळणार नाही.

  • जर एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असेल तर अशा व्यक्तीला नवीन सिमकार्डही दिले जाणार नाही.

  • जर अशी व्यक्ती नियमांचे उल्लंघन करताना पकडली गेली, तर ज्या टेलिकॉम कंपनीने सिम विकले आहे ती दोषी मानली जाईल.


घरबसल्या सिम कार्ड मिळणार
नवीन नियमानुसार, आता ग्राहकांना UIDAI आधारित पडताळणीद्वारे त्यांच्या घरी सिम मिळेल. मोबाईल सिमसाठी ग्राहकांना अॅप/पोर्टल आधारित प्रक्रियेद्वारे दिले जाते ज्यामध्ये ग्राहक घरी बसून मोबाईल कनेक्शनसाठी अर्ज करू शकतात.