Disney+ Hotstar : कोरोना काळानंतर ओटीटी प्लॅटफार्मची मागणी प्रचंड वाढली. वेब सिरीज असो किंवा स्पोर्टस, चित्रपट आणि अनेक प्रकारच्या गोष्टी त्यावर पाहता येतात. मात्र याच पार्श्वभूमीवर Disney+ Hotstar ने वापरकर्त्यांसाठी कंपनीने वेगवेगळे प्लान्स आणले आहेत. तुम्ही जर Disney+ Hotstar वापरत असाल तर कंपनीने आपल्या प्लान्समध्ये काही बदल केले आहेत. यासंदर्भात Disney+ Hotstar ने ट्विट केले आहे. या ट्विटनंतर ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत.   


Disney + Hotstar चे ट्विट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Disney + Hotstar ने ट्विट करत माहिती दिली की, 31 मार्च 2023 पासून या OTT प्लॅटफार्मवरील सर्व वापरकर्त्यांना HBO कंटेंटचा आनंद घेऊ शकणार नाही. कारण HBO चॅनेलबरोबरचा Disney + Hotstar ने केलेला करार आता संपणार आहे. 



 IPL 2023 हे Disney + Hotstar वर पाहता येणार नाही 


तसेच Disney + Hotstar भारतीय वापरकर्त्यांना IPL 2023 स्ट्रीमिंगची ऑफर देखील देणार नाही. कारण Viacom18 चे स्ट्रीमिंग अधिकार देखील त्यांनी गमावले आहेत.  Disney + Hotstar वापरकर्त्यांसाठी हा मोठा धक्का असून Disney + Hotstar ची प्रीमियम सदस्यता सध्या भारतात 1499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. प्लॅटफॉर्मवरून IPL आणि HBO सामग्री काढून टाकल्यानंतर अनेक भारतीय वापरकर्त्यांसाठी Disney+ Hotstar सदस्यता खरेदी करणे फारसे महत्त्वाचे राहिले नाही. तर Jio Cinema वर आयपीएलचे सामने तुम्हाला बघता येणार आहे.    


वाचा : सोने-चांदी खरेदीकरण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर


दरम्यान Disney + Hotstar 2016 पासून HBO च्या शो चे लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहे. तर Disney + Hotstar (पहिले स्टार इंडियाने) लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी 2015 मध्ये एचबीओसह एक करार केला होता. या करारानंतर एचबीओवर ज्या दिवशी अमेरिकेत शो लॉन्च होयचे त्याच दिवशी भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जात होता. नंतर 2020 मध्ये याला Disney + Hotstar असे रीब्रँड करण्यात आले. मात्र आता Disney + Hotstar चे वापरकर्ते या महिन्याच्या अखेरपर्यंत एचबीओवरील कंटेंट पाहू शकतात. त्यामुळे त्यामधील काही बघायचे राहिले असल्यास तुम्ही ते या महिन्यापर्यंत ते पाहू शकता.