Noise i1 Smart Glasses Launched : आजकाल आपल्या आजूबाजूला अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आहेत. त्यात कदाचित सर्वात महत्वाचं इलेक्ट्रॉनिक गॅझेट म्हणजे स्मार्टफोन. तुमचा स्मार्टफोन जे काम करतो तेच आता 'चष्मा' देखील करेल असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. स्वस्तात मस्त फीचर्स  असलेला नवीनतम 'स्मार्ट ग्लासेस' बाजारात उपलब्ध झाला आहे. 


Noise कडून Smart Glasses  लाँच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


Noise ने एक स्मार्ट चष्मा (Smart Glasses) लॉन्च केला आहे. यामध्ये तोडीसतोड अफलातून फिचर्स आहेत. त्याची किंमत 5 हजार 999 रुपये आहे.  हा स्मार्ट चष्मा Noise च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता.


हे स्मार्ट चष्मे स्मार्टफोनचे काम करतील


Noise i1 Smart Glasses भारतात बनवलेले (Made in India) आहेत. या स्मार्ट चष्म्यात मोशन एस्टिमेशन, मोशन कंपेन्सेशन आणि मॅग्नेटिक चार्जिंग यासारख्या अनेक फिचर्स आहेत. मल्टी-फंक्शनल टच कंट्रोल्सह तुम्ही सहजपणे कॉल रिसीव्ह करु शकता. म्यूजिक कंट्रोल करू शकता. तसेच सोबत व्हॉइस असिस्टंट सक्रिय करू शकता.


 


Noise i1 स्मार्ट ग्लासेसची अन्य वैशिष्ट्ये


 


Noise i1 स्मार्ट चष्मा ब्लूटूथ व्हर्जन 5.1 वर काम करतो. उत्तम वैशिष्ट्यांसह या स्मार्ट चष्म्यात दिलेले निळ्या प्रकाशाचे फिल्टरिंग पारदर्शक लेन्स डोळ्यांवर ताण देणार नाही आणि धोकादायक अतिनील किरणांपासूनही संरक्षण करतात. ज्यामुळे डोळ्यांना त्रास उद्भवत नाही. हे ग्लासेस वॉटर प्रूफ आहे. नॉइज i1 स्मार्ट ग्लासेस एकदा चार्ज केल्यास नऊ तास वापरता येतो.