नवी दिल्ली : नोकिया लोकप्रिय कंपनीने त्यांचा नवा नोकिया ८ हा दमदार स्मार्टफोन नुकताच भारतात लॉन्च केलाय. आयफोन ८ नंतर नोकिया ८ लॉन्च केल्याने या फोनकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचएमडी ग्लोबल कंपनीनं आज नोकिया ८ भारतात लॉन्च केला. तर १४ ऑक्टोबरपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात १३ मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे आणि १३ मेगापिक्सलचाच फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे फोटो काढण्याची आवड असणा-यांचं या फोनकडे आकर्षण वाढणार आहे. 


नोकियाने याआधी त्यांचे नोकिया ६, ५ आणि ३ हे तीन अँड्रॉइड फोन याच वर्षी मोबाइल लॉन्च केले होते. आता एचएमडी ग्लोबलनं 'नोकिया' ब्रँडचा आत्तापर्यंतचा सगळ्यात हायटेक फोन सादर केला आहे.


काय आहेत फिचर्स?


४ जीबी रॅम
कॅमेराः १३ मेगापिक्सलचे दोन रिअर / १३ मेगापिक्सल फ्रंट
५.३ इंची स्क्रीन
६४ जीबी इनबिल्ट मेमरी
ऑपरेटिंग सिस्टिमः अँड्रॉइड नोगट
प्रोसेसरः ऑक्टा कोअर (2.45 GHz, Quad core, Kryo 280 + 1.8 GHz, Quad core, Kryo 280)
पॉलिश्ड ब्ल्यू, टेम्पर्ड ब्ल्यू आणि स्टील कलरमध्ये उपलब्ध 


किंमत?
३६,९९९ रु.