Nokia C12 Launched In India: भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये पुन्हा एकदा आपला जम बसवण्यासाठी नोकीया कंपनी प्रयत्न करत आहेत. याच मोहिमेचा एक भाग म्हणून लवकरच कंपनी भारतामध्ये नोकिया सी-12 (Nokia C12) फोन लॉन्च करत आहे. कंपनीने आपल्या सी-सीरीजच्या पोर्टफोलियोमध्ये अजून एका मॉडेलचा समावेश केला आहे. नोकिया सी-12 भारतामधील कंपनीच्या सर्वात स्वस्त फोनपैकी एक आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये हा फोन रेडमी ए वन (Redmi A1), रियलमी सी 30 (Realme C30), टेक्नो स्मार्क गो 2023 (Tecno Spark Go 2023) या फोनशी स्पर्धा करणार आहे. एन्ट्री लेव्हलच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये नोकियासारख्या तगड्या कंपनीने उडी घेतल्याने ग्राहकांना फायदा होणार आहे.


कमी किंमत आणि ब्रॅण्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमी किंमत आणि नामांकित ब्रॅण्डचा स्मार्टफोन असं डेडली कॉम्बीनेशन नोकिया सी-12 च्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे. नोकिया सी-12 भारतामध्ये लॉन्च होणारा मॉडेल हा सिंगल स्टोरेजचा असेल. फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 5999 इतकी आहे. ही कंपनीची इंट्रोक्टरी म्हणजेच नव्याने लॉन्च झाल्यानंतरची विशेष किंमत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये या फोनची किंमत वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.  


नोकिया सी-12 चे फिचर्स


17 मार्चपासून हा फोन अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवरुन भारतामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नोकिया सी-12 ची स्क्रीन 6.3 इंचांची आहे. ऑक्टा कोअर प्रोसेसरसहीत येणाऱ्या या फोनची मेमरी मेमरीकार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढवता येईल. हा फोन अ‍ॅण्ड्रॉइड 12 (गो स्टॉक) अ‍ॅण्ड्रॉइडसहीत उपलब्ध आहे. डार्क सियान, चारकोल आणि लाइट मिंट असा 3 रंगांमध्ये नोकिया सी-12 स्मार्टफोन उपलब्ध आहे. हा मोबाईल फोन आयपी52 रेडेट डस्ट आणि वॉटर प्रूफ आहे. यामध्ये सिक्युरिटीसंदर्भातील फिचर्समध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरचा पर्याय देण्यात आला आहे.


कॅमेरा आणि बॅटरी


नोकिया सी-12 मध्ये एलईडी फ्लॅशसहीत एक 8 मेगापिक्सल रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिंगल स्पीकर, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि मायक्रो-युएसबी पोर्ट या फोनमध्ये आहे. नोकियाने केलेल्या दाव्यानुसार पुढील दोन वर्ष ग्राहकांना या डिव्हाइससाटी सिक्युरिटी अपडेट मिळत राहणार आहे. फोनमध्ये 3000 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 5 व्हॅट चार्जिंगला सपोर्ट करते.