मुंबई : Nokia Smartphone : अनेक स्मार्टफोन निर्माता कंपनी त्यांचे नवीन स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात लॉन्च करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्मार्टफोन ब्रँड Nokia देखील या महिन्यात आपला नवीन स्मार्टफोन Nokia G21 लॉन्च करु शकतो.  हा एक बजेट स्मार्टफोन असेल म्हणजेच त्याची किंमत खूप कमी असेल. या स्मार्टफोनबद्दल अधिक जाणून घ्या.


नोकिया लॉन्च करणार आहे Nokia G21


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकियाचा हा स्मार्टफोन  गीकबेंच (Geekbench) वेबसाइटवर उपलब्ध आहे, त्यामुळे हा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. सहसा कंपन्या या वेबसाइट्सवर त्यांचे फोन आणतात जेणेकरुन फोन किती वेगाने चालतात हे पाहता येईल. जेव्हा फोन लॉन्चसाठी तयार असतो तेव्हा Geekbenchवर सादर केले  जातात. हा फोन या महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो, अशी माहिती लीक झाली आहे.


Nokia G21 डिस्प्ले आणि स्टोरेज


रिपोर्ट्स आणि मिळालेल्या माहितीनुसार, हा नोकिया स्मार्टफोन 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले, HD+ रिझोल्यूशन आणि 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह येऊ शकतो. गीकबेंच सूचीनुसार, Nokia G21 ऑक्टा-कोर युनिसॉक प्रोसेसरवर काम करु शकतो जो Unisock T606 चिप असू शकतो. Android 11 वर चालणारा हा फोन किमान 4GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह येऊ शकतो.


या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आणि इतर फीचर्स 


कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर नोकियाचा हा कमी बजेट स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येऊ शकतो ज्यामध्ये मुख्य किंवा प्राथमिक सेन्सर 50MP चा असू शकतो आणि 2MPचे आणखी दोन सेन्सर असू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, Nokia G21मध्ये सेल्फी घेण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी 8MP फ्रन्ट कॅमेरा येऊ शकतो. आधीच्या रिपोर्ट्सनुसार, तुम्हाला या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
 
दरम्यान, हा स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये लॉन्च होतो की नाही, याबाबत स्पष्टता नाही. असे झाले नाही तर कंपनी लवकरच  फोनबद्दलची माहिती आणि काही तपशील जाहीर करेल.