मुंबई : Nokia कंपनीने दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. अगदी सर्व सामान्य जनतेला परवडेल अशा किंमतीमध्ये कंपनीने दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.  नोकियाने Nokia 3.4 आणि Nokia 2.4 हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. HMD Global ने सध्या या दोन्ही स्मार्टफोन्सला यूरोपमध्ये लाँच केले आहे. Nokia 3.4 ऑक्टोबर महिन्यात तर Nokia 2.4 हा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात नव्याने दाखल होणाऱ्या Nokia 3.4 स्मार्टफोनची किंमत १३ हजार ७०० रूपये असून  Nokia 2.4ची किंमत १० हजार ३०० रूपये असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Nokia 3.4 फिचर्स 
या स्मार्टफोनमध्ये 720x1560 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.३९ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असणार आहे. दोन व्हेरियंटमध्ये हा फोन बाजारात दाखल होणार आहे. 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि  4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे.  फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 460 SoC चिपसेट दिला आहे.


 फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल आहे. 


Nokia 3.4 फिचर्स 
हा फोन 2 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि  3 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. फोनध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबतच ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. 


13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर सुद्धा दिला आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे.