मुंबई : Nokia चा मजबूत बॅटरी असणारा स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे, ज्याचे नाव Nokia Style+ असेल. लॉन्च होण्याअगोदर, स्मार्टफोन यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसलं आहे. या स्मार्टफोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असणार आहे. तसेच, या मोबाईलची बॅटरी 5000mAh इतकी असेल. याशिवाय, रेंडरमध्ये डिझाइन देखील समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


Nokia Style+ ची बॅटरी दमदार असेल



Nokia Style+ हा 5G स्मार्टफोन असेल. नोकियाच्या या स्मार्टफोनला  4900mAh इतकी असणारा बॅटरी युनिट पॅक मिळणार आहे. तसेच, FCC वेबसाइट नुसार हँडसेटमध्ये AD-020US मॉडेलसोबत चार्जर सुद्धा मिळणार आहे. जरी या चार्जरचं पॉवर रेटिंग दिलेल नसलं तरी मागील अहवालानुसार, स्मार्टफोन 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो असा अंदाज आहे.


Nokia Style+ चा अमॅझिंग कॅमेरा



या स्मार्टफोनमध्ये 48MP मेन कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सरसोबत LCD डिस्प्ले आणि मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा असणार आहे. स्मार्टफोनच्या समोर 16MP सेल्फी कॅमेरा असेल.


Nokia Style+ चं स्टाईलिश डिझाइन



Nokia Style+ ने चायना क्वालिटी सर्टिफिकेशन (CQC) आणि वायफाय अलायन्स वेबसाइट्सनेही त्याच मॉडेल नंबरद्वारे भेट दिली आहे. वायफाय अलायन्सनुसार हा  स्मार्टफोन Android 12 आउट-ऑफ-द-बॉक्स आणेल. हा स्मार्टफोन 166.1 mm X 76.4 mm (उंची आणि रुंदी) असणार आहे. रेंडर नुसार, एलईडी फ्लॅशसोबत ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपही या स्मार्टफोनमध्ये असेल.