Most Used Passwords: तुमचा पासवर्डही या 20 पैकी एक आहे का? वेळीच सावध व्हा नाहीतर...
Tech News : `हे` 20 पासवर्ड अजिबात ठेवू नका....; हॅकर्सच्या तावडीत सापडलात तर पश्चातापाचीही वेळ उरणार नाही. तुमचा पासवर्ड तर इथं नाही ना?
Tech News : तंत्रज्ञान जसजसं पुढे जात आहे, तसतसं याच तंत्रज्ञानापासून धोकाही उदभवणारा धोकाही वाढताना दिसत आहे. प्रामुख्यानं सायबर क्राईमची प्रकरणंसुद्धा दर दिवशी वाढत आहेत. जीमेल, बँक खाती आणि तत्सम गोष्टींसाठी वापरले जाणारे पासवर्ड हॅक करण्याचं प्रमाणही प्रचंज वाढलं आहे. त्यामुळं तुमचा पासवर्ड हा unique असणं सध्याच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं समजलं जात आहे.
NordPass या पासवर्ड मॅनेजरकडून नुकताच एक अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये भारतीयांकडून सातत्यानं आणि सर्वाधिक प्रमाणात वापर केल्या जाणाऱ्या पासवर्डची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे पासवर्ड असे आहेत जे हॅकर्स अगदी सहजपणे क्रॅक करु शकतात. त्यामुळं तुम्हीही हेच पासवर्ड ठेवले असतील तर वेळीच सावध व्हा, कारण खासगी माहिती हॅकर्सच्या हाती लागली तर पश्चातापाचीही वेळ उरणार नाही.
काय आहेत common passwords?
NordPass च्या माहितीनुसार भारतीयांकडून सर्वाधिक वापरला जाणारा पासवर्ड आहे, 123456. भारतामध्ये असंख्य युजर्स विविध अॅप, बँकिंग वेबसाईट, जीमेल आणि तत्सम कारणांसाठी हाच पासवर्ड ठेवतात. हा पासवर्ड वापरणाऱ्यांचा नेमका आकडा किती, हे मात्र इथं स्पष्ट सांगण्यातआलेलं नाही. हो, पण हा पासवर्ड अवघ्या एका सेकंदात हॅकर्स क्रॅक करू शकतात हे मात्र इथं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं तुम्हीही हाच पासवर्ड वापरत असाल तर वेळीच सावध व्हा.
हेसुद्धा वाचा : 'लोग भूल जाते हैं...' Final चं आमंत्रण न मिळण्याबाबत कपिल देव असं का म्हणाले?
123456 मागोमागच भारतीयांकडून admin, 12345678 आणि 12345 पासवर्ड म्हणून वापरण्यात येत असून तेसुद्धा एका सेकंदात क्रॅक करणं सहजपणे शक्य होतं. त्यामुळं आता पासवर्ड बदलण्याची वेळ आली आहे हे तुम्हीही लक्षात घ्या.
पासवर्ड आणि ते क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ...
पासवर्ड | क्रॅक करण्यासाठी लागणारा वेळ |
123456 | 1 सेकंद |
admin | 1 सेकंद |
12345678 | 1 सेकंद |
12345 | 1 सेकंद |
PaSSWORD | 1 सेकंद |
123456789 | 1 सेकंद |
1234567890 | 1 सेकंद |
Admin123 | 1 सेकंद |
Password | 1 सेकंद |
Pass@123 | 5 मिनिटं |
Admin@123 | 1 वर्ष |
India @123 | 3 तास |
admin@123 | 34 मिनिटं |
Pass@1234 | 17 मिनिटं |
Abcd@1234 | 17 मिनिटं |
Welcome@123 | 10 मिनिटं |
Abcd@123q | 17 मिनिटं |
Password@123 | 2 मिनिटं |
UNKONWN | 17 मिनिटं |