Nothing Phone 2a Sale: जर तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये नवा पर्याय उपलब्ध आहे. Nothing Phone 2a ला कंपनीने नुकतंच लाँच केलं आहे. 12 मार्च म्हणजेच आजपासून हा स्मार्टफोन सेलमध्ये उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट मिळत आहे. तुम्ही 20 हजारांपेक्षी कमी किंमतीत हा मोबाईल खरेदी करु शकता. 12 मार्चला दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन तुम्ही खरेदी करु शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्मार्टफोनमध्ये OLED डिस्प्ले, MediaTek Dimensity 7200 प्रोसेसर, अँड्रॉईड 14 आणि जबरदस्त कॅमेरा कॉन्फिग्रेशन मिळत आहे. तसंच यामध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 45W सारखे फास्ट चार्जिंग फिचर्सही मिळतात. जाणून घ्या या मोबाईलची किंमत आणि अन्य माहिती. 


नेमकी ऑफर काय आहे?


जर तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचं कार्ड असेल, तर 2000 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट मिळेल. याशिवाय 2000 रुपयांची एक्स्चेंज ऑफर मिळत आहे. कंपनी अतिरिक्त ऑफरसह CMF Buds ची 1999 रुपये आणि CMF Power 65W चार्जरची 1999 रुपयांत विक्री करत आहे.


किंमत किती?


Nothing Phone 2a ला कंपनीने तीन कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच केलं आहे. याचा बेस व्हेरियंट 8GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो. ज्याची किंमत 23,999 रुपये आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 25,999 रुपये आणि टॉप कॉन्फिग्रेशन 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 27,999 रुपये आहे. 


हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्ट, क्रोमा आणि विजय सेल्समध्ये खरेदी करु शकता. 19 मार्चच्या आधी हा स्मार्टफोन खरेदी कऱणाऱ्यांना एक वर्षाचा Perplexity pro सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तुम्ही Nothing.tech वरुनदेखील ही ऑफर मिळवू शकता. 


2000 रुपयांचं कूपन कसं मिळवायचं?


कंपनी काही मोजक्या युजर्सना 2000 रुपयांचं कूपन डिस्काऊंट देत आहे. युजर्स फ्लिपकार्टवरुन क्लेम करु शकतात. यासाठी युजर्सला सर्वात आधी Flipkart App ओपन करावं लागेल आणि My Account मध्ये जावं लागले. तिथे तुम्हाला Coupons च्या पर्यायावर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला 8 डिजिट युनिक कोड टाकावा लागेल. आता तुम्हाला Nothing Phone 2a च्या पेजवर पुन्हा जावं लागले आणि डिस्काऊंट कूपन मिळेल. 


फिचर्स काय आहेत?



Nothing Phone 2a मध्ये 6.7 इंचाच FHD+ OLED डिस्प्ले मिळतो, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Corning Gorilla Glass 5 दिला आहे. स्मार्टफोन MediaTek Dimensity 7200 Pro प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेज मिळतो. 


हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Nothing OS 2.5 वर काम करतो. यामध्ये 50MP + 50MP चा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 5000mAh टी बॅटरी मिळते, जी 45W च्या वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.