सेन्ट फ्रांसिस्को : गेल्या महिन्यात पोर्तुगाल मध्ये झालेल्या परिक्षणानंतर इंस्टाग्राम स्टोरी फेसबुकवर लिंक करण्याचा पर्याय अमेरिकेतील उपयोगकर्त्यांना मिळाला आहे. एका टेक्‍नोलॉजी वेबसाईटच्या नुसार फेसबुकने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या वेबसाईटच्या वृत्तानुसार जगभरात सर्वांसाठी हे फीचर उपलब्ध केले जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकच्या अधिकाऱ्याने सांगितले की, "आता तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीज फेसबुकवर लिंक करू शकता. तो पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षण साठवून ठेवणे सोपे झाले आहे."


मात्र अजून तरी इंस्टाग्राम स्टोरी फेसबुकवर पोस्ट करण्याचा पर्याय उपलब्ध झालेला नाही. मात्र कंपनीने सांगितले कीजे, हा पर्याय देखील लवकरच उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात स्टोरी अपलोड करण्याचा त्रास कमी होईल. 


गेल्या महिन्यात इंस्टाग्रामने युजर्ससाठी मोबाईल आणि डेस्कटॉप दोघांवर देखील स्टोरीज बघण्याची सुविधा सुरु केली आहे. इंस्टाग्रामचे २५ करोडपेक्षा अधिक मासिक सक्रीय युजर्स आहेत आणि या अॅप्लिकेशनचे जगभरात सुमारे ७० करोड युजर्स आहेत. 


या सुविधेबारोबरच इंस्टाग्राम युजर्ससाठी अजून काही क्रिएटिव्ह ऑप्शन्स देण्यात आले आहेत.