Revolt Motors Bike Mobile Feature: देशात इलेक्ट्रिक बाईकची सध्या खूप चर्चा आहे. सध्या तरी भारतात अनेक पर्याय नसले तरी देखील काही खास फीचर्ससह नव्या बाईक लवकरच बाजारात येणार आहेत. रिवोल्ट मोटर्सने घोषणा केलीये. त्यांची इलेक्ट्रिक बाईक वर्चुअली म्हणजेच स्मार्टफोन द्वारे लॉक आणि अनलॉक करता येणार आहे. यासाठी स्मार्टफोनमध्ये MyRevolt App फक्त इन्स्टॉल करावे लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे फीचर रिवोल्ट इलेक्ट्रिक मोटरसाइकलमध्ये सप्टेंबर 2021 मध्ये उपलब्ध होणार आहे. रिवोल्ट इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि हायक्लाउड-बेस्ड सॉफ़्टवेयर सिस्टम असल्याचा दावा आहे.  कंपनीने हा देखील दावा केला आहे की, भारतात अशा प्रकारची टेक्नोलॉजी असणारी ही पहिलीच बाईक असणार आहे. 


रिवोल्ट इलेक्ट्रिक बाईकसह आरवी400 (Revolt Rv400) बाईकमध्ये देखील ही सिस्टम इन्स्टॉल करता येणार आहे.


रिवोल्ट मोटर्सचे संस्थापक आणि डायरेक्टर राहुल शर्मा यांनी म्हटलं की, 'रिवोल्ट वापरणाऱ्यांना वेगळी चावी ठेवण्याची गरज नाहीये. मोबाईलवरुन त्यांना बाईक अनलॉक आणि लॉक करता येणार आहे.'


सध्या या कंपनीने भारतीय बाजारात दोन मॉडल Rv300 आणि Rv400 आणल्या आहेत. ज्याची किंमत 90,800 पासून सुरु होते.