मुंबई : तुम्ही जीमेल वापरता? होय? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, तुमचं Gmail अकाऊंट आता तुम्ही इंटरनेट शिवाय वापरु शकणार आहात. यासाठी तुम्हाला केवळ 5 सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. चला तर मग पाहूयात काय आहेत या स्टेप्स...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलने आपल्या Gmail ला Redesign करण्यासोबतच त्यात अनेक नवे फिचर्स जोडले आहेत. यामध्ये एक खास फिचर म्हणजे ऑफलाईन सपोर्ट आहे. या फिचरच्या सहाय्याने तुम्ही इंटरनेटशिवाय तुमचं Gmail अकाऊंट वापरु शकणार आहात.


ई-मेल रिसिव्ह आणि डीलिट करु शकता


Gmail मधील या फिचरमुळे तुम्ही इंटरनेट शिवाय तुमचं Gmail वापरु शकता. नवा ईमेल रिसिव्ह करु शकता तसेच ईमेल डीलिटही करु शकता. इतकचं नाही तर तुम्ही कुणालाही ईमेलही सेंड करु शकता.


हे नवं फिचर वापरण्यासाठी क्रोम ब्राऊजर व्हर्जन 61 ची आवश्यकता आहे. पाहूयात कशा प्रकारे हे फिचर वापरता येईल. 


  • स्टेप 1 - सर्वात आधी क्रोम 61 डाऊनलोड करा


  • स्टेप 2 - Gmail च्या टॉप राईट साईडवर जाऊन gear-like Settings वर क्लिक करा


  • स्टेप 3 -  ड्रॉप डाउन मेन्युमध्ये 'Settings' टॅबवर क्लिक करा.


  • स्टेप 4 - आता मेन्युमध्ये जाऊन 'Offline' टॅबवर क्लिक करा.


  • स्टेप 5 - त्यानंतर ‘Enable offline mail’ पर्यायावर क्लिक करा.


अशा प्रकारे तुम्ही इंटरनेट शिवाय तुमचं Gmail अकाऊंट वापरु शकणार आहात.