आता जिओ फोनमध्ये देखील चालेल व्हॉट्स अॅप...
काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओने 4G फीचर फोन बाजारात लॉन्च केला.
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओने 4G फीचर फोन बाजारात लॉन्च केला. लाखो लोकांनी रिलायन्सच्या या स्वस्त फोनची प्री-बुकिंग केली होती. आता त्याची डिलिव्हरी सुरु झाली आहे. त्यानंतर त्याच्या फीचर्सची जोरदार चर्चा सुरु झाली. तेव्हा रिलायन्स जिओच्या फोनमध्ये व्हॉट्स अॅप चालणार नाही, असे बोलले जात होते. लाखो लोकांनी हा फोन खरेदी तर केला मात्र त्याच्या फीचर्सबद्दल अनेकांना माहिती नव्हती.
रिलायन्स जिओच्या या 4G फीचर फोनमध्ये व्हॉट्स अॅप हे ऑफिशियल अॅप नाही आहे. मात्र युट्युबवर व्हायरल झालेल्या एका ट्रिकमुळे काही युजर्सना जिओ फोनमध्ये व्हॉट्स अॅप चालवण्याचा मार्ग सापडला आहे. फोन हातात आल्यावर यात व्हॉट्स अॅप चालणार नसल्याने अनेक युजर्स हैराण होते. मात्र तुमच्यकडे देखील हा फोन असेल तर तुम्ही अगदी सहज त्यात व्हॉट्स अॅप चालू करू शकता.
जाणून घेऊया ती खास ट्रिक :
सर्वात आधी जिओ फोनमध्ये ब्राऊजरमध्ये www.browserling.com ओपन करा. या वेबसाईटवर आपल्याला ५ प्रकारचे ब्राऊजर्स मिळतील. त्यात क्रोम सिलेक्ट करा.
त्यानंतर वेबसाईटवरील अॅड्रेस बार वर web.whatsapp.com ओपन करा. तेथे तुम्हाला एक क्यूआर (QR) कोड दिसेल. या कोड 3 नंबर बटणाने झूम करा.
आता तुम्ही ज्या फोनमधून व्हॉट्स अॅप चालवता त्यात व्हॉट्स अॅप वेबमध्ये जाऊन QR कोड स्कॅन करा.
अशाप्रकारे तुमच्या जिओ फोनमध्ये व्हॉट्स अॅप ओपन होईल.
तुम्ही जोपर्यंत लॉगआऊट करत नाही तोपर्यंत यात व्हॉट्स अॅप ओपन राहील. तुम्ही ज्या फोनमध्ये व्हॉट्स अॅप चालवता तो फोन देखील तुमच्या जिओ फोन सोबत ठेवा. लांब गेल्यास इंटरनेट प्रॉब्लेम येऊ शकतो.