मुंबई : आपण पूर्णपेणे आपल्या स्मार्टफोनवरती अवलंबून असतो, परंतु असे असले तरी  इंटरनेटशिवाय स्मार्टफोनच्या अनेक स्मार्ट फीचर्सचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून ते अगदी कामासाठी देखील आपल्याला इंटरनेट लागतो. तुम्हाला हे देखील माहित असेल की, Gamil वापरण्यासाठी देखील आपल्याला इंटरनेट लागतो. त्याच्याशिवाय Gmail आपण वापरू शकत नाही. त्यामुळे महत्वाच्या इमेलची आपण वाट पाहत असू किंवा आपल्याला मेल करायचा असेल, तर आपण घराबाहेर पडत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्हाला माहितीय काय की, तुम्ही इंटरनेटशिवायही जीमेल वापरू शकता. Google च्या मेल सेवेमध्ये म्हणजे Gmail मध्ये, तुम्ही इंटरनेटशिवाय देखील मेल वाचू शकता किंवा रिप्लाय देखील देऊ शकता.


या वैशिष्ट्याला जीमेल ऑफलाइन म्हणतात. या फीचरच्या मदतीने तुम्ही वीक इंटरनेट किंवा इंटरनेटशिवायही Gmail अॅक्सेस करू शकता. तुम्ही हे वैशिष्ट्य कसे वापरू शकता ते जाणून घ्या.


यासाठी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये क्रोम सेटअप आहे हे लक्षात ठेवावे लागेल. तुम्ही क्रोम ब्राउझरच्या विंडोमध्येच जीमेल ऑफलाइन उघडू शकता. लक्षात ठेवा की, तुम्ही हे गुप्त मोडमध्ये करू शकणार नाही.


सर्व प्रथम वापरकर्त्यांना https://mail.google.com/mail/u/0/#settings/offline वर जावे लागेल.


येथे तुम्हाला ऑफलाइन मेल सक्षम करावे लागतील.


आता वापरकर्ते त्यांच्या पसंतीनुसार सेटिंग बदलू शकतात. उदाहरणार्थ, तुम्हाला किती दिवसांचा डेटा सिंक करायचा आहे हे तुम्ही ठरवू शकता.


वापरकर्त्यांना आता सेव्ह चेंजवर क्लिक करावे लागेल.


हे केल्यानंतर, वापरकर्त्यांचा इनबॉक्स बुकमार्क केला जाईल. याच्या मदतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन मोडमध्ये जीमेल ऍक्सेस करू शकाल. 
तुम्ही ऑफलाइन मोडमध्ये मेल पाठवताच, तो आउटबॉक्स फोल्डरमध्ये हलवला जाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्यावर आपोआप पाठवला जाईल.


तुम्ही हे फीचर देखील त्याच प्रकारे बंद करू शकता. यासाठी तुम्हाला https://mail.google.com/mail/u/0/#settings/offline वर जावे लागेल. ऑफलाइन मोडच्या समोर दिसणारा बॉक्स अनचेक करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे विशेष फीचर बंद करू शकता.