मुंबई : Jio Phone आणि Jio Phone 2 च्या ग्राहकांना रिलायन्स जिओने आजपासून आणखी एक सरप्राईझ दिलं आहे. कंपनीने जिओफोन युझर्सना व्हॉटसअॅपनंतर आता YouTube  अॅप देखील यावर पाहता येणार आहे. जिओ फोन वापरणारे आता यूट्यूब व्हिडीओ देखील पाहू शकणार आहेत. याआधी रिलायन्स जिओने, जिओ फोन, जिओ फोन २ ग्राहकांसाठी १० सप्टेंबरपर्यंत व्हॉटसअॅप दिलं आहे. तसेच २० सप्टेंबरपर्यंत हे सर्व फोनमध्ये देखील उपलब्ध होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओ फोन वापरणारे ग्राहक १९ सप्टेंबरपासून यूट्यूब व्हिडीओचा आनंद घेऊ शकतील. या जिओ फोनच्या अॅपस्टोअरवर तो डाऊनलोड करता येणार आहे. 


तुमच्याकडे सुरूवातीचा जिओ फोन किंवा नंतरचा जिओ फोन २ असेल तरी देखील तुम्ही यूट्यूब अॅप त्यात डाऊनलोड करू शकता. रिलायन्सने काही महिन्याआधी रिलायन्स जिओने अपग्रेटेड वेरियंट जिओफोन २ लॉन्च केला होता.


जिओ फोनमध्ये व्हॉटसअॅप डाऊनलोड करण्यासाठी , सर्वात आधी फोनच्या मेन्यू ऑप्शनमध्ये जा, यानंतर App Store सर्च करा. अॅपस्टोअरवर क्लिक करा, तेथे यूट्यूब सर्च करा. यानंतर त्याला डाऊनलोड करा. एकावेळा डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही मनासारखे व्हिडीओ पाहू शकता.