फक्त १ रुपयांत मिळणार अनलिमिडेट डेटा....
कॅनडा डेटाविंड कंपनीने BSNL सोबत करार केला आहे.
नवी दिल्ली : कॅनडा डेटाविंड कंपनीने BSNL सोबत करार केला आहे. यात ते युजर्सना १ रुपयात एका दिवसासाठी अनलिमिडेट इंटरनेट डेटा देतील. याचा अर्थ युजर्स महिन्याला फक्त ३० रुपये खर्च करून अनलिमिडेट इंटरनेट डेटाचा लाभ घेऊ शकतो. या प्लॅनमुळे नक्कीच स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे इतर प्लॅनही स्वस्त होतील, असे बोलले जात आहे.
कसा होईल फायदा
डेटावंड कंपनी BSNL सोबत मिळून हा प्लॅन सामान्य लोकांपर्यंत पाठवेल. यासाठी BSNL युजर्सला डेटाविंड कंपनी द्वारे बनवलेले एक अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करावे लागेल. हे कंपनीचे पेटेंटेड अॅप आहे.
कॅनडाचे प्रधानमंत्री करतील लॉन्च
डेटाविंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंग तुलीनुसार, फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रूडो भारत दौऱ्यावर येणार आहेत. यात स्वस्त इंटरनेट पॅक सेवा लॉन्च करण्यात येईल. या प्लॅनमध्ये 1GB, 2GB डेटा यांसारखी कोणतीही मर्यादा नसेल. तर अनलिमिटेड डेटा मिळेल. किती डेटा वापरायचा हे युजरवर अवलंबून असेल. इंटरनेट स्पीड BSNL स्पीड बरोबरच असेल. मात्र ब्राऊजिंग स्पीड ३०% वाढेल.
दुसऱ्या कंपन्याही करणार करार
BSNL शिवाय डेटाविंडसोबत करार करण्याचा इतर कंपन्यांचा मानस आहे. सध्या करार फक्त बीएसएनएल सोबतच झाला आहे. याव्यतिरिक्त रिलांयन्स जिओ, एअरटेल, आयडिया, वोडाफोन इतर कंपन्यांसोबतही चर्चा सुरू आहे. दुसऱ्या कंपन्यांनी ही करार केल्यास त्यांच्या ग्राहकांना स्वस्त दरात इंटरनेट सेवा मिळेल.