दिग्गज कंपन्या फक्त पाहत राहिल्या! `या` कंपनीच्या Electric Scootersची धडाक्यात विक्री; 40 टक्के मार्केट घेतलं ताब्यात
Ola Scooter: देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची (Electric Scooter) मागणी वाढली असताना Ola Scooter ने 40 टक्के मार्केट आपल्या ताब्यात घेतल्याचं दिसत आहे. Ola Scooter सलग आठव्यांदा देशातील सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करणारा ब्रॅँड ठरला आहे.
Ola Scooter: भारतीयांमध्ये वाहनांची असणारी आवड पाहता अनेक मोठ्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करत आहेत. त्यातही सध्या इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehilce) वाहनांची मागणी प्रचंड वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची जागतिक बाजारपेठ पाहिली तर यामध्ये भारताचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारतीय बाजारपेठेकडे (Indian Market) अपेक्षेने पाहिलं जात आहे. दरम्यान भारतात इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लोक Ola Scooter ला सर्वाधिक पसंती देत असल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर Ola ने तब्बल 40 टक्के बाजारपेठ आपल्या ताब्यात घेतली आहे.
सध्या भारतात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी वाढत आहे. यामुळे अनेक कंपन्यात बाजारात नवनव्या इलेक्ट्रिक दुचाकी आणत आहेत. यादरम्यान एका ब्रँडने इतर कंपन्यांना मोठी मात दिली आहे. बाजारात Ola Scooter ने ग्राहकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याचं कारण म्हणजे, इलेक्ट्रिक टू व्हिलर सेगमेंटमध्ये नव्याने पाऊल ठेवणाऱ्या Ola ने एप्रिल महिन्यात 30 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली आहे. यासह Ola देशातील सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री कऱणारी कंपनी ठरली आहे.
Ola ने एप्रिल महिन्यात किती स्कूटर्सची विक्री झाली याची माहिती सादर केली आहे. त्यानुसार, कंपनीने एका महिन्यात तब्बल 30 हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली आहे. सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या जाणाऱ्या कंपनीच्या यादीत Ola ने सलग आठव्यांदा पहिलं स्थान मिळवलं आहे. यासह इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमधील कंपनीची भागीदारी 40 टक्क्यांवर पोहोचल्याचा कंपनीचा दावा आहे. याचा अर्थ टीव्हीएस, एथर एनर्जी, हिरो, बजाज, ओकिनावा आणि इतर ब्रँडच्या स्कूटर यांची एकूण भागीदारी 60 टक्के आहे.
ओलाने विक्रीत 30 हजारांचा आकडा पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्च महिन्यात कंपनीने 17 हजार युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच कंपनी महिन्याला 10 टक्के जास्त विक्री करत आहे. दरम्यान Ola देशभरात आपले एक्सीपिरियन्स सेंटर्स वाढवत आहे. याचं कारण कंपनीचा दावा आहे की, ओलाचे 90 टक्के ग्राहक हे एक्सीपिरियन्स सेंटर्सच्या 20 किमी परिसरात राहणारे आहेत.
ओलाची किंमत किती?
OLA ने इलेक्ट्रिक स्कूटरमधअये S1 Air, S1 आणि S1 Pro हे पर्याय दिले आहे. कंपनी ने बेस मॉडल S1 Air ची किंमत 84,999 रुपये ठेवली आहे. ही स्कूटर 101 किमीची रेंज देते. तर S1 मॉडलसाठी 99,999 रुपये मोजावे लागत आहेत. या स्कूटरची रेंज 128 किमी आहे. तसंच S1 Pro ची किंमत 1,24,999 रुपये (एक्स-शोरूम) असून 170 ची रेंज देते.