मुंबई: जिओ आणि वोडाफोन कंपन्यांसोबत स्पर्धेत असलेल्या Airtel कंपनीने स्वस्तात मस्त आणि जास्त सेवा देणारा प्लॅन आणला आहे. आपल्या वेगवेगळ्या प्लॅन्सद्वारे कायमच ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात. जिओ आणि Airtel मध्ये स्पर्धा जास्त आहे. या नव्या प्लॅनमध्ये तुम्हाला 5 रुपयात 1 GB डेटा मिळू शकणार आहे. नेमका हा प्लॅन काय आहे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्लॅनसोबत डिझनी आणि हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन देण्यात आलं आहे. जे एअऱटेलचे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वात बेस्ट असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. एअरटेलच्या ग्राहकांना 448 रुपये प्रीपेड प्लॅन घ्यावा लागणार आहे. यामध्ये तुम्हाला 5 रुपयांत 1 GB डेटा मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग, 100 SMS आणि अन्य सुविधान मिळणार आहे. 


448 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 3 GB डेटा रोज याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS अशी सेवा मिळणार आहे. डिझनी आणि हॉटस्टार 1 वर्षासाठी सबस्क्रीपशन मिळणार आहे. या सबस्क्रिप्शनला जर तुम्ही वेगळं घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला 399 रुपये द्यावे लागणार आहेत. 28 दिवसांसाठी तुम्हाला 84 GB डेटा मिळणार आहे. या हिशोबाने विचार करायचा झाला तर 1 GB डेटा हा 5.30 रुपयांमध्ये मिळतो. 


याशिवाय तुम्हाला 349 चा प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्हाला अमेझॉन प्राइम मोबाईलवर मोफत मिळू शकतं. याशिवाय 2 GB डेटा कुपन जर तुम्ही एअरटेल थॅक्स अॅपवरून रिचार्ज केला तर मिळू शकतं. त्याचा फायदा तुम्हाला होतो. 2 GB डेटा, 100 SMS आणि फ्री कॉलिंग अशी सेवा या प्लॅनमध्ये आहे.