Whatsapp वर एक छोटी चूक तुम्हाला तुरुंगात पाठवू शकते...या चूका कधीही करु नका
हे प्लॅटफॉम योग्यप्रकारे न वापरल्यास कंपनी तुम्हालाही बंदी घालू शकते.
मुंबई : जर कोणी मेसेजिंग अॅपचे नाव घेतले, तर व्हॉट्सअॅपचे नाव आपल्या मनात प्रथम येते. व्हॉट्सअॅप आज प्रत्येकाच्या फोनमध्ये आहे. त्यामुळे जर आपल्याला कोणालाही मॅसेज झटपट पाहिजे असेल तर आपण ते व्हॉट्सअॅपवरच करतो. व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्म आपण गप्पा मारण्यासाठी, कॉल करण्यासाठी किंवा व्हिडीओ कॉल करण्यासाठी वापरतो. भारतात व्हॉट्सअॅप बरेच यूझर्स आहेत. परंतु बर्याच वेळा असे होते की, युझर्स या व्हॉट्सअॅपचा चुकीचा वापर करातात.
जसे की, लोकं यामार्फत बनावट संदेश, अफवा किंवा फसवणूक करणारे मॅसेजेस पाठवतात. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅपने आता अलीकडेच अशा खात्यांवर मोठी कारवाई करायला सुरवात केली आहे, तर या अंतर्गत एकूण 20 लाख खात्यांवर बंदी घातली आहे.
अशा परिस्थितीत तुम्ही देखील हे प्लॅटफॉम योग्यप्रकारे न वापरल्यास कंपनी तुम्हालाही बंदी घालू शकते. यासाठी तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, कोणत्या कारणांसाठी व्हॉट्सअॅप यूझर्सचे अकाउंट बंद करत आहे आणि कोणत्या कारणांसाठी यूझर्सला तुरुंगात जावे लागणार आहे? तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअॅप कसे वापरावे याचा अंदाज येईल.
दोन प्रकारच्य अकाउंटवर बंदी घातली जाऊ शकते
व्हॉट्सअॅपने तुमच्या अकाउंटवर बंदी घातल्यास त्यात दोन प्रकारच्या बंदी येतात. प्रथम तात्पुरते आणि द्वितीय कायम. तात्पुरते मध्ये आपल्याला चेतावणी मिळेल आणि नंतर आपण आपले खाते काही काळानंतर परत मिळवू शकाल परंतु कायमस्वरूपीमध्ये तसे होत नाही. कायमस्वरुपी बंदीमुळे तुमचे अकाउंट कायमचे बंदी होईल.
जर आपण व्हॉट्सअॅपवर एखाद्याला बनावट संदेश किंवा स्पॅम संदेश पाठवला तर आपल्याला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. तर जर दुसर्या वापरकर्त्याला तुमच्या संदेशामुळे काही नुकसान झाले असेल आणि त्याने पुढे जाऊन तक्रार केली असेल, तर तुमच्याविरूद्धही कारवाई केली जाऊ शकते.
व्हॉट्सअॅपवर बर्याच वेळा आपण कोणतीही शहानिशा न करता कोणताही मेसेज आपण फॉरवर्ड करतो. अशा परिस्थितीत तुमचे खाते बंद केले जाऊ शकते. दुसरीकडे, जर आपण व्हॉट्सअॅपवर चाइल्ड पॉर्न शेअर केले तर त्यासाठी देखील तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते.
थर्ड पार्टी अॅप्सपासून लांब रहा
व्हॉट्सअॅपचे थर्ड पार्टी अॅप्स हे व्हॉट्सअॅप प्रमाणेच असतात. परंतु त्यामध्ये आपल्याला बरीच वैशिष्ट्ये मिळतात. अशा परिस्थितीत वापरकर्ते त्यांचा वापर करण्यास सुरवात करतात. परंतु आपण जर व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि तरीही तुमच्या फोनमध्ये थर्ड पार्टी अॅपही चालू असेल, तर तुमच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते.
कारण थर्ड पार्टी अॅप्स बर्याचदा आपला डेटा चोरतात आणि आपल्याला त्याबद्दल माहितीही नसते. म्हणून कधीही व्हॉट्सअॅप ग्रीन, व्हॉट्सअॅप जीबी प्लस किंवा इतर कोणतेही अॅप वापरू नका.
एक चुकीचा संदेश पाठवेल तुरुंगात
बर्याच वेळा असे घडते की, कुठेतरी दंगल उसळली आणि लोक थेट व्हॉट्सअॅपवर त्यासंदर्भात संदेश पाठवतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही यात सामील असाल तर तुम्हाला तुरुंगात पाठवले जाऊ शकते. यामध्ये तुमच्यावर अफवा पसरवल्याचा आरोपही होऊ शकतो.