OnePlus 10 Pro वर छप्परफाड offer; थेट वाचवा 12000 रुपये
मोबाईल जगतामध्ये मागील काही दिवसांपासून क्रांतीकारक बदल झाले आणि त्या बदलांच्या धर्तीवर खिशाला परवडणाऱ्या दरात अनेकांनाच स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव घेता आला. या मोबाईल जगतातील एक अग्रगणी नाव म्हणजे OnePlus चं.
OnePlus 10 Pro offer: एखादा चांगला स्मार्टफोन घ्यायचाय, उत्तम टेक्नॉलॉजी आणि अप्रतिम कॅमेरा त्यात हवाच या अशा अपेक्षा तुम्ही जेव्हा एखाद्या विश्वासार्ह मित्र किंवा मैत्रीणीकडे मांडता, किंवा फारफारतर एखाद्या मोबाईलच्या शोरूममध्ये Sales Person कडे मांडता तेव्हा त्यांच्याकडून अनके पर्याय तुमच्यापुढे सादर केले जातात. खिशाला परवडणाऱ्या दरात मग या पर्यायांची पडताळणी सुरु होते आणि सरतेशेवटी बऱ्याच तासांच्या विचारानंतर अखेर कोणता मोबाईल घ्यायचा हे ठरवलं जातं. सध्या तुम्हीही अशाच विचारात आहात का? मोबाईल घ्यायच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी बंपर लॉटरीच!
samsung, Apple iPhone, Google अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच मोबाईल मार्केटमध्ये आला OnePlus 10 Pro. अफलातून फिचर्स असणाऱ्या या मोबाईलनं अनेकांनाच थक्क केलं. काहींनी तर, आयफोनपेक्षा याच मोबाईलला सर्वाधिक पसंती दिली. आता तुम्हीही हा मोबाईल स्वत:साठी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी खरेदी करु शकता. कारण, OnePlus.in आणि Amazon वर या फोनच्या विक्रीसाठी कमाल ऑफर देण्यात येत आहे.
काय आहे ही ऑफर?
वनप्लसकडून सुरु असणाऱ्या या ऑफरमध्ये OnePlus 10 Pro 5G वर थेट 12 हजार रुपये वाचवता येत आहेत. भारतात हा फोन मागील वर्षी 66,999 रुपयांना लाँच झाला होता. Snapdragon 8 Gen 1 chipset, 12 जीबी रॅम, 80W फास्ट चार्जिंग अशा फिचर्ससाठी अनेकांनी ही तगडी किंमतही मोजली.
आता याच फोनची किंमत उतरून 55,999 रुपयांना अॅमेझॉनवर उबलब्ध आहे. जिथं तुम्ही साधारण 11 हजार रुपये वाचवता. तर, कंपनीच्या वेबसाईटवरून हा फोन खरेदी करायचा झाल्यास ICICI बँक कार्ड्सवर तुम्हाला यामध्ये आणखी 1000 रुपयांची सूट मिळते. ज्यामुळं या फोनसाठी तुम्ही भरता 54999 रुपये.
हेसुद्धा वाचा : King Charles III यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं शाही घराण्याचा खजिना प्रथमच जगासमोर Live
इतर सवलती...
One Amazon, Kotak Mahindra Bank चे कार्ड असणाऱ्यांना आणखी 750 रुपयांची सवलत मिळते. त्यामुळं तुमची कमाल बचत इथं सहज शक्त होते. तेव्हा विचार करण्यात वेळ घालवू नका, कारण 8 मे पर्यंतच तुम्ही या सवलतीचा फायदा घेऊ शकता. OnePlus 10 Pro च्या 4G मॉडेलवरही तुम्हाला 10 हजार रुपयांतची सूट मिळते.
वनप्लसच्या इतर फोनवरही दणदणीत Offers!
वनप्लसकडून OnePlus 10T मॉडेलवर फ्लॅट 5000 रुपयांची तर, OnePlus 10R वर फ्लॅट 4 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. OnePlus.in, OnePlus Store App, OnePlus Experience stores आणि अॅमेझॉनवर तुम्हाला ही ऑफर मिळेल.
तर, OnePlus Nord CE2 Lite वर अॅमेझॉनवर आणि वनप्लसच्या वेबसाईटवर 500 रुपयांची सूट आहे. OnePlus Nord 2T वरही 1500 रुपयांची सवलत तुम्हाला मिळू शकते. आयसीआयसीआय बँकेचं कार्ड असल्यास तुम्हाला या मोबाईलवर आणखी 1000 रुपये वाचवता येऊ शकतात.