लवकरच येणार OnePlus चा पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन, जाणून घ्या काय असेल खास?
Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर लॉन्च झाले. यानंतर, Xiaomi, OPPO, Huawei, Motorola सारख्या ब्रँडने देखील त्यांच्या फोल्डेबल डिस्प्लेसह फोन बाजारात आणले आहेत.
OnePlus : सध्या बाजारात फोल्डेबल फोनला जास्त प्रमाणात पसंती दिसून येत आहे. बाजारात सॅमसंगने या आधीच फोल्डेबल स्मार्टफोन सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. Samsung Galaxy Z Fold 4 आणि Galaxy Z Flip 4 गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर लॉन्च झाले. यानंतर, Xiaomi, OPPO, Huawei, Motorola सारख्या ब्रँडने देखील त्यांच्या फोल्डेबल डिस्प्लेसह फोन बाजारात आणले आहेत. त्याच वेळी, Apple आणि Google देखील त्यांच्या पहिल्या फोल्डेबल फोनवर काम करत आहेत, ज्याच्याशी संबंधित अनेक लीक्स समोर आले आहेत. त्यानंतर आता OPPO Find N foldable स्मार्टफोन नंतर OnePlus चा फोल्डेबल फोन देखील लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. एका नवीन अपडेटमध्ये, वनप्लसचे सह-संस्थापक पीट लाऊ यांनी ट्विटरवर फोल्डेबल स्मार्टफोनच्या डेव्हलपमेंटबद्दल माहिती देण्यासाठी काही खास फोटो शेअर केली. मात्र, नाव आणि इतर तपशीलांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
ट्विटरवर फोटो शेअर करत त्यांनी फॉलोअर्सना आगामी फोल्डेबल फोनबद्दल विचारले आहे. पेट लाऊने शेअर केलेल्या पोस्टमध्ये OnePlus चा हा फोल्डेबल फोन OPPO Find N सारखा आहे. OnePlus Foldable फोन पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. Mi Mix Fold 2 गेल्या आठवड्यात चीनी बाजारात लॉन्च करण्यात आला होता. हा सध्याचा सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्याच वेळी, OPPO Find N बद्दल बोलायचे तर, तो Samsung च्या फोल्डेबल फोनसारखा दिसतो.
OPPO Find N ची वैशिष्ट्ये
OPPO Find N मध्ये 7.1-इंचाचा मुख्य डिस्प्ले आहे. त्याच वेळी, यात कॉम्पॅक्ट 5.49-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या मुख्य डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश दर आहे. फोनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देण्यात आला आहे. या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या कॅमेऱ्याचे डिझाईन Galaxy Z Fold 3 आहे.
यात 50MP Sony IMX 766 प्राथमिक सेन्सर आहे. याशिवाय फोनमध्ये 16MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 13MP टेलिफोटो सेन्सर देण्यात आला. सेल्फी कॅमेरा फोनच्या आतील आणि बाहेरील दोन्ही डिस्प्लेमध्ये उपलब्ध असेल. हा फोन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरवर काम करतो.
यात 12GB LPDDR5 रॅम आणि 512GB UFS 3.1 स्टोरेजसाठी सपोर्ट आहे. तसेच, या फोल्डेबल फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आहे. ज्यासह 33W SuperVOOC फ्लॅश चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल. याशिवाय यामध्ये 15W AIRVOOC वायरलेस चार्जिंग फीचर देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन ड्युअल स्पीकर सिस्टम आणि डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करतो.