मुंबई : जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन असू शकेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनची कंपनी वनप्‍लसने भारतात आपला लेटेस्‍ट फोन वनप्‍लस 5टी हा नवीन वेरिएंट लावा रेड अॅडिशन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 37999 रुपये आहे.


फोनची बुकींग सुरु


फोनची विक्री 20 जानेवारीपासून सुरु होणार आहे. कंपनीने या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्‍ट मेमरी दिली आहे. फोनची विक्री अॅमेझॉन इंडियावर 20 जानेवारीपासून दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. या फोनची बुकींग सुरु झाली आहे.


वनप्लस 5टी स्पेसिफिकेशन 


या फोनमध्ये 6.01 इंचची फुल-एचडी+ ऑप्टिक एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याची स्‍क्रीन रिजोल्‍यूशन 1080x1920 पिक्सल आहे. अस्पेक्ट रेशो 18:9 आहे. फोनच्या स्क्रीनवर 2.5डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. वनप्लस 5 प्रमाणे वनप्लस 5टीमध्ये देखील ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आलं आहे.


डुअल रेअर कॅमरा सेटअपला यामध्ये अपडेट केलं गेलं आहे. या फोनमध्ये दोन कॅमेरे आहेत जे वनप्लस 5 पेक्षा वेगळे आहेत. प्रायमरी सेंसर वनप्लस 5 प्रमाणे आहे. 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा तर 20 मेगापिक्सल सोनी सेंसर आहे.