OnePlus Open: जगात कुठेही आणि कोणाकडेही नसणारा फोन बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या हातात दिसल्याने एकच चर्चा सुरू झाली. आयफोन, सॅमसंग नव्हे तर वनप्लसचा फोन अनुष्काच्या हातात स्पॉट झाला आहे. OnePlus आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे. मात्र, स्मार्टफोन लाँच होण्याआधीच अनुष्का शर्मा वापरत असल्याचे समोर आले आहे. अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत तिच्या हातात एक स्पेशल व्हिडीओ दिसत आहे. जो अद्याप लाँच करण्यात आला नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काच्या हातात असलेला हा फोन OnePlus Open असू शकतो. हा फोन कंपनीचा पहिला फोल्डिंग फोन असण्याची शक्यता आहे. कंपनी 19 ऑक्टोबरला हा फोन लाँच करण्याची शक्यता आहे. त्यामुळं फोनच्या मार्केटिंग साठीची ही स्ट्रेटजी असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. कारण अनुष्का शर्मा मुद्दामून फोन कॅमेऱ्याच्या दिशेने ओपन करताना दिसत आहे. त्यामुळं फोन लाँचच्या आधीची ही स्ट्रॅटजी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


कंपनी लवकरच फोल्डिंग फोन बाजारात लाँच करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या फोनचे नाव OnePlus Open असेल हे कंपनीने आधीच स्पष्ट केले होते. या वर्षांच्या सुरुवातीला कंपनी फोन लाँच करणार होती. मात्र, आता या फेस्टिव्ह सिझनमध्ये कंपनी पहिल्या फोल्डिंग फोनची लाँचिग होण्याची शक्यता आहे,   


OnePlus Open मधील स्पेशिफिकेशन्स कसे असतील? 


OnePlus Openमध्ये ऑक्टोकोर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असू शकतो. रिपोर्टनुसार, या फोनमध्ये 7.8 इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. स्क्रीन 120 hZ रिफ्रेश रेट सपोर्टसोबत येऊ शकतात. या फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो त्याचबरोबर प्रायमरी कॅमेरा 50 MP असू शकतो. 


वनप्लसचा हा नवीन फोन OIS सपोर्टसोबत येऊ शकतो. त्याचबरोबर 48 MP चा वाइड अँगल  लेन्स आणि 32 MPचा पेरीस्कॉपिक लेन्स मिळू शकते. त्याचबरोबर फोनमध्ये 3X Zoom फिचरदेखील मिळू शकते. कंपनी 32 MP फ्रंट कॅमेरा देऊ शकते. पावर बॅकअपसाठी  ४,८०० एमएएचची बॅटरी मिळू शकते जी १०० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.


OnePlus Open ची संभाव्य किंमत


वनप्लस ओपन ची किंमत १,१०,००० ते १,२०,००० रुपयांदरम्यान असू शकते. एका रिपोर्टनुसार, Oppo Find N2 किंवा Pixel Fold या सारख्या डिझाइनसह हा फोन लाँच होऊ शकतो.