मुंबई : उत्सवाच्या या सीझनसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर धमाकेदार ऑफर्स आणि सेलची सुरूवात झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंवर भरमसाठ सूट दिली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लिपकार्टवर २० सप्टेंबरपासून सेल सुरु झालाय तर अ‍ॅमेझॉनवरही मोठी सूट दिली जात आहे. काही वेबसाईट्सवर तर १०० टक्के कॅशबॅक ऑफर दिल्या जात आहेत. 


अ‍ॅमेझॉन इंडियाने ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ मध्ये त्यांच्या प्राईम ग्राहकांसाठी २० सप्टेंबरपासून सेलला सुरूवात केली आहे. हा सेल २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान चालणार आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष, कॅटेगरी मॅनेजमेंट मनीष तिवारी यांनी सांगितले की, ‘पहिल्यांदा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २० सप्टेंबरला दुपारी १२ वाजतापासून केवळ प्राईम सदस्यांसाठी सुरू झाला’. अ‍ॅमेझॉन इंडियावर स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, कपडे, फर्निचर अशा अनेक वस्तूंवर ऑफर दिली जात आहे. 


कॅशकरोचे सह-संस्थापक स्वाती भार्गव म्हणाले की, ‘यंदाची सर्वात खास गोष्ट म्हणजे आधी केवळ फ्लिपकार्ड आणि अ‍ॅमेझॉनसारख्या मोठ्या वेबसाईट सेलची घोषणा करायच्या. मात्र यावेळी सहा ते सात वेगवेगळ्या कंपन्यां म्हणजेच जबॉंग, शॉपक्लूस आणि पेटीएम यांनीही सेल सुरु केले आहेत’.


शॉपक्लूसने ‘महाभारत दिवाली सेल’ २० सप्टेंबरपासून सुरू केला आहे. हा सेल २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात घरातील फर्निचर, किचन फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ५० ते ८० टक्के सूट दिली आहे. यासोबतच इतरही अनेक वस्तूंवर मोठी सूट दिली जात आहे’.


पेटीएमने ‘मेरा कॅशबॅक सेल’ २० सप्टेंबरपासून सुरू केला आहे. हा सेल २३ सप्टेंबरपर्यंत सुरू राहिल. पेटीएम मॉलच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली की, ‘हा आमचा उत्सव सेल आहे आणि या सेलच्या माध्यमातून आमच्याकडे आम्ही ४ ते ५ लाख ग्राहक येतील अशी आशा करत आहोत’.