एसबीआयमध्ये उघडा झीरो सेव्हिंग खाते, किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही!
आपल्याला बॅंकेत खाते उघडण्याची इच्छा असेल तर आपल्याला किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नाही.
मुंबई : आपल्याला बॅंकेत खाते उघडण्याची इच्छा असेल तर आपल्याला किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नाही. (बचत खात्यात शिल्लक रक्कम नसेल तर बॅंक तुमच्याकडून दंड स्वरुपात शुल्क कापत असे) आणि आपण बचत खात्याच्या रुपात त्याचा वापर करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर देशात अन्य बॅंकाही ही सुविधा देत आहेत. असे लोक बीएसबीडी (बेसिक बचत बँक ठेव) खाते उघडू शकतात. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग यासारख्या सोयीसुविधांचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
एसबीआयचे बीएसबीडी खाते
१. बीएसबीडी खाते एकट्याचे तसेच संयुक्तपणे अशा दोन्ही प्रकारे उघडू शकता. यासाठी आपल्याकडे वैध केवायसी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
२. एकदा खाते उघडले की आपल्याला रुपे डेबिट कार्ड मिळेल. हे विनामूल्य तसेच त्याची वार्षिक देखभाल शुल्क देखील द्यावा लागत नाही.
३. एनईएफटी / आरटीजीएसद्वारे ऑनलाईन व्यवहार केले जाऊ शकतात. ही सुविधा विनामूल्य आहे.
४. चेकबुक देखील विनामूल्य मिळते.
५. न वापरात असलेले खाते सक्रिय केले जाऊ शकते. तसचे सक्रिय खाते बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
६. एका महिन्यात चार व्यवहार तुमच्या आणि दुसऱ्या बँकेचे एटीएम विनामूल्य आहेत.
७. बचत खात्यावरील व्याज नियमित बचत खात्याच्या रूपात मिळते. १ लाखापेक्षा कमी, ३.५ टक्के वार्षिक आणि १ लाखांहून अधिक रुपयांसाठी ३.२५ टक्के व्याजदर मिळतो.
एसबीआय व्यतिरिक्त एचडीएफसी, पीएनबी, आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक देखील बीएसबीडी खात्यांना सुविधा देत आहेत. ग्राहक एका खात्यात एक खाते उघडू शकतो. बँकिंग सेवेमध्ये अधिकाधिक लोकांना जोडण्यासाठी हे केले गेले आहे.