मुंबई : आताच्या स्मार्ट जगामध्ये तरूणांना स्मार्टफोनचं कायम आकर्षण असतं. स्मार्टफोन घ्यायचा विचार केला तर कोणता फोन घ्यायचा अशा प्रश्न सर्वांनाचं पडतो. तर आता स्मार्ट विश्वात Oppo कंपनीने सर्वात अधिक स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme 8 5Gनंतर Oppo कंपनीने 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. त्यामुळे आता कोणत्या स्मार्टफोनची मागणी वाढते हे महत्त्वाचं ठरणार आहे, Realme 8 5G स्मार्टफोनची किंमत 14 हजार 999 रूपये आहे. तर Oppo A53s 5G फोन Realme 8 5G स्मार्टफोनपेक्षा फक्त 9 रूपयांनी स्वस्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Oppo A53s 5G ची  किंमत 14 हजार 990 आहे. Oppo A53s 5G स्मार्टफोन 2 व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक व्हेरिएंटची किंमत 14 हजार 990 आहे, तर दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 16 हजार 990 रूपये आहे. 14 हजार 990 रूपये किंमतीच्या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम + 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे. 


16 हजार 990 रूपये किंमतीच्या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम + 128GB स्टोरेज आहे. A53s 5G दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. क्रिस्टल ब्लू आणि ब्लॅक रंगांचे पर्याय आहे.  जर तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर फ्लिपकार्ड किंवा रिटेल स्टोरमध्ये उपलब्ध आहे. फोन खरेदीवर काही ऑफर्स देखील आहेत. 


ज्यामध्ये  एचडीएफसी बँकेकडून 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. स्टँडर्ड चार्टर्ड, कोटक बँक, बँक ऑफ बड़ौदा आणि फेडरल बँकचे कार्ड देखील सामील आहेत, फ्लिपकार्ट यूजर फुल किंवा ईएमआईच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. 


जाणून घ्या स्मार्टफोनचे फिचर्स
- Oppo A53s 5G स्मार्टफोन 6.52-इंच HD + एलसीडीसोबतचं टियरड्रॉप नॉच असणार आहे. 
- हा स्मार्टफोन 8.4 मिमी पातळ आहे. 
- स्मार्टफोनच्या पाठीमागच्या बाजूस ट्रिपल कॅमरा सेटअप आहे.  शिवाय फ्लॅश लाईट देखील आहे. 
- Oppo A53s 5G फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल आहे.