OTT चं सबस्क्रिप्शन नसलं तरी `या` प्लॅटफॉर्मवर मोफत पाहता येणार Webseries
OTT चं सबस्क्रिप्शन नाहीए, तरीही मोफत पाहता येणार वेबसीरीज
मुंबई : सध्या ओटीटीचं विश्व आहे,अनेकजण सिनेमागृहात न जाण्यापेक्षा घरीच बसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरीज पाहतात. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून ओटीटीचा प्रेक्षक वर्ग वाढला आहे. मात्र ओटीटीवर सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला महिन्याभराचे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागते. जे प्रत्येकाला शक्य नसते. त्यामुळे जे ओटीटीवर सिनेमा पाहू शतक नाही अशांसाठी काही प्लॅटफॉर्म असे आहेत, ज्यावर मोफत सिनेमे पाहता येणार आहे.
नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, डिझनी प्लस हॉटस्टार, सोनी लिव सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक वेब सिरीज रिलीज होत असतात. पण या वेब सिरीज पाहण्यासाठी तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे. आणि सबस्क्रिप्शन साठी बक्कळ पैसे मोजावे लागतात. त्यामुळे अनेकजण सबस्क्रिप्शन घेणे टाळतात. पण तुम्हाला माहित आहे का, असे काही OTT प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तम वेब सिरीज पाहू शकता. हे प्लॅटफॉर्म कोणते आहेत ते जाणून घ्या.
एमक्स प्लेयर
एमक्स प्लेयर (MX Player) हे एक प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर अनेक वेबसीरीज मोफत पाहता येतात. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शनशिवाय वेब सिरीज पाहू शकता. या प्लॅटफॉर्मवर एक किंवा दोन नव्हे तर 12 भाषांमध्ये कंटेट उपलब्ध आहे.
वुट अॅप
वुट अॅपवर (Voot) देखील तुम्ही सबस्क्रिप्शनशिवाय वेब सिरीज सहज पाहू शकता. एवढेच नाही तर वूटवर कलर्स आणि एमटीव्हीचे अनेक शो तुम्ही पाहू शकता. यासाठी कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करण्याची गरज नाही.
जिओ सिनेमा
तुम्ही जिओ सिनेमा अॅपवर (Jio Cinema App) देखील चित्रपट, वेब सिरीज आणि मालिका मोफत पाहू शकता. हा प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी तुमच्याकडे जिओ सिम असणे आवश्यक आहे. केवळ जिओ वापरकर्ते मोफत सिनेमे पाहू शकतात.
अॅमेझॉन मिनी टिव्ही
तुम्ही अॅमेझॉन मिनी टिव्हीवर (Amazon Mini TV) कॉमेडी, हॉरर, अॅक्शन, थ्रिलर यासारखे कंटेंट अगदी मोफत पाहू शकता. येथे अनेक भाषांमध्ये वेब सिरीज उपलब्ध आहेत. 'अमेझॉन मिनी टीव्ही' वापरण्यासाठी अॅमेझॉन अॅप किंवा वेब साइटवर जावे लागेल आणि पर्यायावर क्लिक करावे लागेल.
टूबी
टूबी (Tubi) या अॅपबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. टूबी मोफत सीरीज पाहण्यासाठी एक उत्तम अॅप आहे. ज्यांना हॉलीवूड वेब सिरीज आवडतात त्यांच्यासाठी हे अॅप खूप चांगले आहे.
प्लेक्स
प्लेक्सवर तुम्ही वेब सिरीज, चित्रपट आणि 200 हून अधिक चॅनेल अगदी मोफत पाहू शकता. Tubi प्रमाणे, हे अॅप देखील Google Play Store आणि Apple Play Store वरून डाउनलोड केले जाऊ शकते. Plex वर हिंदी कॉटेंट देखील उपलब्ध आहे.